Virat Kohli Home Test Series Record esakal
क्रीडा

IND vs ENG : मायदेशात विराट भारी की चेतेश्वर..? गोलंदाजीत तर एकच नाव

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Home Test Series Record : इंग्लंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंडचा संघ भारतीय संघासोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत गेल्या काही वर्षापासून मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करतोय. भारताने मायदेशात 2012 मध्ये शेवटची कसोटी मालिका गमावली होती. इंग्लंडनेच भारताला त्यांच्यात घरात मात दिली होती.

दरम्यान, 2012 नंतर भारताने भारतात 46 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 36 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे तर तीन सामने गमावले आहेत. 7 कसोटी सामने ड्रॉ झालेत.

भारताची मायदेशातील विनिंग पर्सेंटेज हे 78.26 इतके आहे. ऑस्ट्रेलियाचा 90 च्या दशतकात आणि 2000 पर्यंत असा दबदाबा होता. ऑस्ट्रेलियाने 1998 ते 2007 दरम्यान मायदेशात 47 कसोटी सामने खेळले होते. त्यातील फक्त तीन कसोटी गमावल्या तर 9 कसोटी ड्रॉ झाल्ाय आहेत. त्यांचे विनिंग पर्सेंटेज हे 79.66 इतके होते. भारताने इंग्लंडकडून 2012 मध्ये मालिका गमावल्यानंतर आतापर्यंत मयादेशात सलग 16 कसोटी मालिका जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाला मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या होत्या.

भारतात कोण भारी, विराट की चेतेश्वर?

कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात सर्वाधिक धावा करण्यामध्ये विराट कोहली अग्रसर आहे. त्याने 2013 नंतर मायदेशात 43 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 3629 धावा केल्या. या धावा त्याने 61 च्या सरासरीने केल्या आहेत. यात 12 शतकांचा देखील समावेश आहे. दुसरीकडे चेतेश्वर पुजाराने 44 कसोटी सामन्यात 31009 धावा केल्या आहेत. त्याचे सरासरी 49.34 इतकी आहे.

गोलंदाजीत अश्विन सर्वात पुढे

मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत रवी अश्विनचा हात कोणी धरत नाही. त्याने 2012 पासून मायदेशात 46 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 283 विकेट्स घेतल्या आहेत. तर रविंद्र जेडजाने 39 कसोटी सामन्यात 191 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT