क्रीडा

'याच मैदानावर मला IPL सामना खेळताना दुखापत...' IND vs ENG सामन्यापूर्वी KL राहुलच्या झाली त्या घटनेची आठवण

Kiran Mahanavar

India vs England : वर्ल्ड कप 2023 चा 29 वा सामना रविवारी 29 ऑक्टोबरला भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. लखनऊच्या एकना स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियाने या स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. त्याला विजयी घोडदौड सुरू ठेवायची आहे. या सामन्यात केएल राहुलही दिसणार आहे. हा सामना त्याच्यासाठी खूप खास असेल कारण तो त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. काही महिन्यांपूर्वी आयपीएलदरम्यान याच मैदानावर राहुल जखमी झाला होता. आजही तो विसरता येत नाही. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

आशिया कप स्पर्धेपासून भारतीय संघातील वातावरण खूप छान आहे. भरपूर मेहनत करण्यासोबत आम्ही धमाल मस्तीही करतो आहोत. प्रत्येक सामन्यात चांगले यष्टीरक्षण करणाऱ्या खेळाडूला खास पदक दिले जात आहे, त्या सोहळ्यात खूप मजा येत आहे. ज्याने वातावरण मस्त ठेवायला फायदा होत आहे, असे के. एल. राहुल आजच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी आज सराव करताना म्हणाला.

इंग्लंड संघाबद्दल बोलताना राहुल म्हणाला, "गेल्या काही सामन्यांत निकाल त्यांच्या बाजूने लागले नाहीत याचा अर्थ इंग्लंडचा संघ कमजोर होत नाही. आम्ही त्यांच्याबद्दल अभ्यास केला आहे, पण मुख्य लक्ष आमच्या बलस्थानांवर आहे. मला संघ व्यवस्थापनाने फलंदाजी सोबत विकेट किपिंगची जबाबदारी दिली असल्याने मी जास्त मेहनत करून परतलो यांचा मला फायदा होतो आहे.

भारतात खेळताना प्रत्येक ठिकाणी हवा आणि खेळपट्टीचा स्वभाव बदलतो. त्याच्याशी जमवून घेऊन खेळात बदल करणे हेच खरे आव्हान आहे, जे भारतीय संघाला आवडते आहे, लखनऊच्या वातावरणाबाबत बोलताना राहुलने मत व्यक्त केले. याच मैदानावर मला आयपीएल सामना खेळताना दुखापत झाली होती. रविवारच्या सामन्यात चांगला खेळ करून त्या कटू आठवणी मला पुसून टाकायची इच्छा आहे, असे राहुलने जाताना सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT