india vs ireland first t20 weather update rain to play encounter dublin 
क्रीडा

IND vs IRE: हवामान खात्याचा अंदाज पहिल्या टी-20 सामन्यात पडू शकतो पाऊस

डब्लिनमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-20 दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Kiran Mahanavar

IRE vs IND 1st T20: टीम इंडिया 1 जुलैपासून एजबॅस्टन येथे सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त असताना दुसरीकडे, भारत आणि आयर्लंड रविवारी डब्लिन येथे दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळल्या जाणार आहे. रोहित शर्मा किंवा विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या प्रथमच टी-20 संघाचे नेतृत्व करत आहे. (india vs ireland first t20 weather update rain to play encounter dublin)

आयर्लंडमधील टी-20 मालिकेमध्ये अनेक नवीन खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही संघांचे खेळाडू या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र पावसामुळे खेळ खराब होऊ शकतो. हवामानाच्या अंदाजानुसार, रविवारी डब्लिनमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-20 दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. डब्लिनमधील द व्हिलेज येथे खेळल्या जाणाऱ्या दोन्ही सामन्यांची तिकिटे आधीच विकली गेली आहेत. परंतु स्टेडियमचे प्रेक्षक आणि टीव्ही पाहणाऱ्या चाहत्यांसाठी तसेच ऑनलाइन पाहणाऱ्यांसाठी ही वाईट बातमी असू शकते कारण पावसामुळे खेळ खराब होऊ शकतो. डब्लिनमध्ये पावसाची शक्यता 71 टक्के आहे. त्याच वेळी दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि तापमान सुमारे 13 अंश सेल्सिअस राहील.

बदललेल्या हवामानात खेळण्याच्या आव्हानाबद्दल बोलताना हार्दिक हसत-हसत म्हणाला, आम्ही ज्या हवामानात नुकतेच खेळून आलो त्यापेक्षा थंडी जास्त आहे. खास करून डब्लिनला वारे वाहू लागले की, हवा बदलते. सगळ्या खेळाडूंना बदलत्या हवामानाची समज आहे. तेच आव्हान आहे जे पेलायला संघ तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT