India vs Japan Hockey  esakal
क्रीडा

India vs Japan Hockey : भारत - जपान सेमीफायन केव्हा, कुठं अन् कधी पहायची लाईव्ह... जाणून घ्या एका क्लिकवर

अनिरुद्ध संकपाळ

India vs Japan Hockey : एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज गुणतालिकेत अव्वल असलेला भारत जपानशी सेमी फायनलमध्ये भिडणार आहे. या सामन्यात स्पर्धेत एकही सामना न गमावलेला भारतीय संघ संभाव्य विजेता असेल. भारताने राऊंड रॉबिन स्टेजमधील चार सामन्यात विजय मिळला असून एक सामना ड्रॉ झाला होता. (Asian Champions Trophy Semi Final Live Streaming)

मात्र भारताला हा सामना हलक्यात घेऊन चालणार नाही. कारण भारताला या स्पर्धेत एकाच संघाला पराभूत करता आलेलं नाही. तो म्हणजे जपान! जपान आणि भारत यांच्यातील लीग स्टेजमधील सामना 1 - 1 असा ड्रॉ झाला होता. दोन्ही संघांच्या रँकिंगमध्ये मोठा फरक आहे.

भारतीय संघ रँकिंगमध्ये चौथ्या तर जपान 19 व्या स्थानावर आहे. मात्र भारताला हे विसरून चालणार नाही की 2021 मध्ये ढाका येथे झालेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत सेमी फायनलमध्येच भारताचा 5 - 3 असा पराभव केला होता.

भारत - जपान सामना कधी होणार आहे?

भारत आणि जपान यांच्यातील एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचा सेमी फायनल सामना आज 11 ऑगस्टला होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल कोठे होणार आहे?

भारत आणि जपान यांच्यातील सेमी फायनल ही चेन्नईच्या मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर होणार आहे.

भारत - जपान सामना किती वाजता सुरू होईल?

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा हाय व्होल्टेज सेमी फायनल सामना रात्री 8.30 मिनिटांनी सुरू होईल.

हा सामना कोणच्या टीव्ही वाहिनीवर लाईव्ह पाहता येईल?

भारत आणि जपान यांच्यातील सेमी फायनल सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.

सेमी फायनल सामना लाईव्ह स्ट्रीम कोठे होणार?

भारत आणि जपान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे फॅनकोडवरून होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT