IND vs NZ 1st ODI Match
IND vs NZ 1st ODI Match 
क्रीडा

IND vs NZ: रोहितने नाही दिली संधी! 'या' खेळाडूची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच एंडिंगला

Kiran Mahanavar

IND vs NZ 1st ODI Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीनंतर रोहित शर्मा आणि टॉम लॅथम या दोन्ही कर्णधारांनी आपापल्या संघांची घोषणा केली. भारताने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. पण एक युवा खेळाडूंना संधी दिली नाही.

केएस भरत आणि इशान किशन यांचा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी यष्टीरक्षक म्हणून टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. इशान किशन प्लेइंग-11 चा भाग असणार आहे आणि मधल्या फळीत फलंदाजी करेल. अशा परिस्थितीत केएस भरतने या सामन्यात बेंचवर बसणे निश्चित केले आहे.

यापूर्वी केएस भरतला केवळ कसोटी संघात स्थान मिळले होते, पण यावेळी त्याला वनडे संघात स्थान मिळले होते. मात्र, तो अद्याप टीम इंडियासाठी पदार्पण करू शकलेला नाही. केएस भरतला कसोटी संघात बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघात ठेवण्यात आले आहे. या मालिकेतही असेच काहीसे दिसल आहे.

केएस भरत देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेश संघाकडून खेळतो. केएस भरतने 2013 मध्ये डेब्यू सामना खेळला होता. त्याने 86 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4707 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 शतके आणि 27 अर्धशतके झळकावली.

तर लिस्ट ए ने 64 सामन्यात 1950 धावा केल्या आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये 5 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. केएस भरतने टीम इंडियासाठी एका सामन्यात विकेटकीपिंगही केले आहे. केएस भरतने कसोटी सामन्यात जखमी रिद्धिमान साहाच्या जागी विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT