हार्दिक - सूर्याचा अर्ध्यावर मोडला डाव; भारत अडचणीत
हार्दिक - सूर्याचा अर्ध्यावर मोडला डाव; भारत अडचणीत esakal
क्रीडा

IND vs NZ 1st T20I : वॉशिंग्टन सुंदरची झुंज ठरली अपयशी; न्यूझीलंडचा पहिल्या सामन्यात विजय

अनिरुद्ध संकपाळ

India vs New Zealand 1st T20I : पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 21 धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 177 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला 20 षटकात 8 बाद 155 धावाच करता आल्या. अर्शदीपने शेवटच्या षटकात दिलेल्या 27 धावा भारताला महागात पडल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने शेवटपर्यंत झुंज देत 28 चेंडूत 50 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनेही 47 धावा करत भारताला सामन्यात आणले होते.

तत्पूर्वी, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने 20 षटकात 6 बाद 176 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने 35 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला डॅरेल मिचेलने 30 चेंडूत नाबाद 59 धावा करत चांगली साथ दिली. मिचेलने अर्शदीप टाकत असलेल्या शेवटच्या षटकात 27 धावा चोपल्या. अर्शदीपने षटकाचा पहिलाच चेंडू नो बॉल टाकला होता. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 22 धावात 2 बळी घेतले.

भारताचा डाव 155 धावात संपुष्टात 

115-7 : दीपक हुड्डा देखील परतला

पांड्या आणि सूर्या बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुड्डा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सँटनरने हुड्डाला 10 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला शिवम मावी देखील 2 धावा करून धावबाद झाला.

89-5 : ब्रेसवेलनं केली पांड्याची शिकार

सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्यावर भारताचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती. मात्र ब्रेसवेलला मोठा फटका मारण्याच्या नादात तो 21 धावांवर बाद झाला.

83-4 : इश सोधीने फोडली जोडी

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवची जोडी अखेर इश सोधीने फोडली. त्याने 47 धावांवर सूर्याला बाद करत त्याला अर्धशतक पूर्ण करू दिले नाही.

हार्दिक - सूर्याने डाव सावरला 

भारताची अवस्था 3 बाद 15 धावा अशी झाली असताना आक्रमक सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्याने चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचत डाव सारवला.

15-3 : भारताची खराब सुरूवात 

न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. भारताने पहिल्या तीन विकेट अवघ्या 15 धावात गमावल्या. शुभमन गिल 7, इशान किशन 4 तर राहुल त्रिपाठी शुन्यावर बाद झाला.

अर्शदीपच्या शेवटच्या षटकात 27 धावा

न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलने अर्शदीपच्या शेवटच्या षटकात तब्बल 27 धावा चोपत न्यूझीलंडला 20 षटकात 6 बाद 176 धावांपर्यंत पोहचवले. 19 व्या षटकात 23 चेंडूत 33 धावा करणारा मिचेल थेट 30 चेंडूत 59 धावांपर्यंत पोहचला. न्यूझीलंडही 149 धावांवरून थेट 176 धावांपर्यंत पोहचली.

140-5  : अखेर कॉन्वे झाला बाद 

35 चेंडूत 52 धावांची खेळी करत न्यूझीलंडला 150 च्या जवळ पोहचवणाऱ्या डेवॉन कॉन्वेला अखेर अर्शदीप सिंगने बाद करत किवींना पाचवा धक्का दिला.

डेवॉन कॉन्वेचे दमदार अर्धशतक

न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज डेवॉन कॉन्वेने भारताविरूद्ध पुन्हा एकदा मोठी खेळी केली. त्याने अर्धशतक ठोकत न्यूझीलंडला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचण्यास मदत केली.

103-3 : कुलदीप यादवने फोडली सेट जोडी

पाचव्या षटकात पाठोपाठ दोन विकेट्स पडल्यानंतर डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्स यांनी किवांचा डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 60 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी किवींचे शतक धावफलकावर लावले. अखेर ही जोडी कुलदीप यादवने फोडली. त्याने ग्लेन फिलिप्सला 17 धावांवर बाद केले.

NZ 43/2 (5) अखेर वॉशिंग्टनने फिनचा झंजावात रोखला

वॉशिंग्टन सुंदरने 23 चेंडूत 35 धावा ठोकणाऱ्या एलन फिनला बाद करत भारताला पहिला यश मिळून दिले. यानंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्क कॅम्पमनला शून्यावर बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले.

NZ 37/0 (4) : न्यूझीलंडची दमदार सुरूवात 

भारताने प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या 4 षटकात दमदार सुरूवात केली. कर्णधार हार्दिक पांड्याच्या पहिल्याच षटकात किवींनी 12 धावा चोपून टोन सेट केला. एलन फिनने एकट्याने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्याची धुरा आपल्या खांद्यावर वाहिली.

भारताने नाणेफेक जिंकली 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याने संघात फार बदल केलेले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT