IND vs NZ Sakal
क्रीडा

IND vs NZ : अय्यर-अश्विन जोडी फुटली, पण...

कानपूरच्या मैदानातील रेकॉर्डवर नजर टाकली तर...

सुशांत जाधव

Shreyas Iyer and R Ashwin 50 run partnership : कानपूरच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी फ्लॉप शो दाखवला. अवघ्या 51 धावांत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अश्विनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी (52) भागीदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे टीम इंडियाने आपली आघाडी दिडशे पार नेली आहे.

अय्यरपेक्षा कमी चेंडू खेळून त्यापेक्षा अधिक धावा अश्विनने केल्या. तो दमदार खेळी करतोय असे दिसत असताना जेमीसनने पुन्हा एकदा टीम इंडियाला गोत्यात आणले. त्याने अश्विनच्या रुपात टीम इंडियाला सहावा धक्का दिला. अश्विनने 62 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 32 धावांचे योगदान दिले.जोडी फुटली असली तरी हे अर्धशतक भारतीय संघासाठी उपयुक्त असेच आहे. याशिवाय पहिल्या डावातील शतकवीर अय्यरही मैदानात आहे. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या दिवशी विकेटमागे न दिसलेला वृद्धिमान साहा बॅटिंगसाठी मैदानात उतरला आहे. ही बाब टीम इंडियासाठी आनंददायी अशीच आहे.

कानपूरच्या मैदानातील रेकॉर्डवर नजर टाकली तर चौथ्या डावात 240 धावाही या मैदानातील सर्वोच्च धावसंख्या आहे. 1958 मध्ये एवढ्या धावा करुनही टीम इंडियाला वेस्ट इंडीज विरुद्धचा सामना गमवावा लागला होता. 2016 मध्ये न्यूझीलंडने चौथ्या डावात 236 धावा केल्या होत्या. यावेळी त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता. 1976 मध्ये न्यूझीलंडने 7 बाद 193 धावा करत सामना अनिर्णित राखला होता. 1996 कानपूरच्या मैदानात खेळताना दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात 180 धावांपर्यंत मजल मारता आली होती. 1979 मध्ये ऑस्ट्रेलियाने 125 धावा केल्या होत्या. दोन्ही संघाच्या पदरी पराभव आला होता.

कानपूरच्या मैदानात चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना जिंकणं मुश्किल असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. अश्विन अय्यरने अर्धशतकी खेळीसह भारतीय संघाला दिडशेपेक्षा अधिक आघाडी मिळवून दिली आहे. तळाच्या फलंदाजांची अय्यरला साथ मिळाली आणि टीम इंडियाने जर आणखी 100 धावा केल्या तर न्यूझीलंडसमोर हे तगडे आव्हान निर्माण करण्यात संघ यशस्वी ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025 : वैभव सूर्यवंशीने गाजवले हे वर्ष! अनेक वर्ल्ड रेकॉर्ड, Google Search मध्ये अव्वल अन् राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Crime: फक्त २० रुपयांवरून वाद पेटला, पतीला राग अनावर झाला, आधी पत्नीला संपवलं नंतर..; धक्कादायक कृत्यानं गाव हादरलं

Latest Marathi News Live Update : मावळ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन, 'मावळ केसरी' किताबासोबतच चांदीची गदा देण्याचा खास मान

शुटिंगदरम्यान जितेंद्र जोशीच्या गळ्याला बसलेला फास, अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगताना म्हणाला... 'स्टूल काढलं अन्...'

Salman Khan Birthday: टायगर, तुमचे प्रेम.... ! सलमानसाठी एक्स गर्लफ्रेंड कतरिनाची वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

SCROLL FOR NEXT