India Vs New Zealand 3rd T20 Suryakumar Yadav esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : तिसऱ्या T20 सामन्यात सूर्याच्या रडारवर आता रिझवान, बाबरला आधीच टाकलंय मागं

अनिरुद्ध संकपाळ

India Vs New Zealand 3rd T20 Suryakumar Yadav : भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात यजमान न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने नाबाद 111 धावांची शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 6 बाद 191 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंडला 126 धावात रोखले. भारताकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

दम्यान सूर्यकुमार यादवने फक्त 111 धावांची खेळी केली नाही तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे 2022 च्या कॅलेंडर वर्षात 10 अर्धशतके ठोकण्याचा विक्रम देखील मागे टाकला. सूर्यकुमार यादवची आता 2022 मध्ये 11 अर्धशतके झाली आहेत. आता सूर्यकुमार यादवच्या रडारवर पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान आहे. त्याने 2022 मध्ये 13 अर्धशतके ठोकली आहेत.

सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात 51 चेंडूत 111 धावा ठोकल्या होत्या. त्याने या धावा 217.65 च्या स्ट्राईक रेटने कुटल्या. आपली खेळी त्याने 11 चौकार आणि 7 षटकारांनी सजवली. आता न्यूझीलंडविरूद्धचा तिसरा टी 20 सामना हा नॅपियर येथे उद्या (दि. 22 नोव्हेंबर) खेळवला जाणार आहे. सध्या एका वर्षात सर्वाधिक टी 20 धावा करण्यात पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (1326 धावा) आघाडीवर आहे. त्याच्या खालोखाल सूर्यकुमार यादवचा (1151 धावा) नंबर लागतो.

मात्र रिझवानला मागे टाकण्यासाठी 176 धावांची गरज आहे आणि सूर्यकुमारकडे हे रेकॉर्ड मागे टाकण्यासाठी वर्षातला एकच टी 20 सामना शिल्लक आहे. पहिला टी 20 सामना जर वॉशआऊट झाला नसता तर हे रेकॉर्ड सूर्याच्या टप्प्यात असते. तसंही सूर्याची रेंज इतकी वाढली आहे की तो अश्यक्य ही शक्य करून दाखवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT