IND vs NZ Hardik Pandya ODI Captaincy esakal
क्रीडा

IND vs NZ : हार्दिक पांड्या वनडेचा 'पर्मनंट' कॅप्टन होऊ शकत नाही कारण...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs NZ Hardik Pandya ODI Captaincy : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका उद्या (दि 18) पासून हैदराबाद येथून सुरू होत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेते लंकेला 3 - 0 असा व्हाईट वॉश दिला.

जरी रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने लंकेला व्हाईट वॉश दिला तरी वनडेचा कर्णधार रोहित शर्मा असावा की हार्दिक पांड्या हा वाद काही शमलेला नाही. टी 20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याकडे वनडेची कॅप्टन्सी देखील सोपवण्यात यावी ही चर्चा सध्या जोर धरत आहे. मात्र रोहित शर्माला डावलून हार्दिकच्या गळ्यात वनडे कॅप्टन्सीची माळ घालणे तितके सोपे नाही.

मिळालेल्या माहितीनुसार या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे वर्ल्डकप होणार आहे. त्यानंतरच रोहितच्या जागी हार्दिक पांड्या वनडेचा कर्णधार होऊ शकतो. मात्र अजून एक मेख आहेच. हार्दिक पांड्याला जर भारताचा वनडे कर्णधार व्हायचं असेल तर त्याला स्वतःला फिट ठेवावे लागेल. यासाठी वर्कलोड मॅनेजमेंटचा वापर होणार आहे.

भारताचा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या पाठदुखीच्या मोठ्या दुखण्यातून सावरला असला तरी त्याला ही दुखापत पुन्हा उद्भवू नये म्हणून वेळोवेळी विश्रांतीची देखील गरज आहे. त्यामुळे तो एकसलग मालिका खेळू शकणार नाही. वनडे मालिकेनंतर लगचेच टी 20 मालिका खेळणे पांड्यासाठी सोपे नाही. हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.

हार्दिक पांड्याने 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या तीन वनडे मालिकेत 100 धावा केल्या होत्या. तर 6 विकेट्स घेतल्या होत्या. 2023 मध्ये हार्दिक पांड्याने आतापर्यंत 2 वनडे सामन्यात 50 धावा आणि एक विकेट घेतली आहे. तर तीन टी 20 सामन्यात 45 धावा आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT