shikhar dhawan sakal
क्रीडा

IND vs NZ : 'एखाद्याला राग आला तरी...', धवनच्या वक्तव्याने संघात खळबळ

एकदिवसीय मालिकेपूर्वी धवन म्हणातो - मी आता कर्णधार म्हणून कठीण निर्णय...

Kiran Mahanavar

IND vs NZ ODI Series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेत शिखर धवनला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. धवन तिसऱ्यांदा टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध कर्णधार असताना त्याने भारतासाठी तीन सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियाला दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-1 अशा फरकाने आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 3-0 अशा फरकाने जिंकली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी शिखर धवनने क्रिकइन्फोशी केलेल्या संभाषणात म्हटले की, 'तुम्ही जितके जास्त खेळता तितका तुमच्या निर्णयांबद्दल अधिक आत्मविश्वास असतो. याआधी असे प्रसंग यायचे की मी गोलंदाजाचा आदर करत त्याला अतिरिक्त षटके द्यायचो, पण आता मी परिपक्व झालो आहे आणि कुणाला वाईट वाटले तरी मी संघाच्या हिताचा निर्णय घेईन.

कर्णधारपदाच्या अनुभवाविषयी बोलताना धवन म्हणाला की, संतुलन राखणे आणि खेळाडूंचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तंतुवाद्यावर संगीत वाजवता, जर तार खूप सैल असेल तर ती चांगली वाजणार नाही किंवा तार खूप घट्ट असेल तर ती तुटते. त्यामुळे ते संतुलन निर्माण करण्याशी जोडलेले आहे. कर्णधार म्हणून समतोल निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT