India vs New Zealand World Cup 2023 Semi-Final Head-To-Head Pitch
India vs New Zealand World Cup 2023 Semi-Final Head-To-Head Pitch  sakal
क्रीडा

Ind vs Nz Semi Final : हिशेब चुकते करण्याची वेळ! अपराजितच्या कवचकुंडलांमुळे भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा वरचढ

सकाळ ऑनलाईन टीम

Ind vs Nz Semi Final : गत विश्वकरंडक स्पर्धा...उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारताची हार. त्यानंतर कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून पराभव. या सर्व अपयशाचे हिशेब चुकते करण्याची योग्य वेळ आता आलीय. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ अपराजितची कवचकुंडले परिधान करून मैदानात उतरत आहे. सर्व खेळाडूंचा कमालीचा फॉर्म भारताला श्रेष्ठ ठरवत आहे. मात्र उपांत्य फेरीचे दडपण न घेता सातत्य ठेवावे लागणार आहे.

सलग उपांत्य फेरी गाठणारे संघ

  • ५ ः इंग्लंड (१९७५, ७९, ८३, ८७, ९२)

  • ५ ः न्यूझीलंड (२००७, २०११, १५, १९, २३)

  • ४ ः पाकिस्तान (१९७९, ८३, ८७, ९२)

  • ४ ः ऑस्ट्रेलिया (१९९६, ९९, ०३, ०७)

  • ४ ः भारत (२०११, १५, १९, २३)

  • ३ ः वेस्ट इंडीज (१९७५, ७९, ८३)

  • ३ ः श्रीलंका (२००३, ०७, ११)

वर्ल्डकपमध्ये भारतीय

  • विराट कोहली (५९४ धावा),

  • रोहित शर्मा (५०३),

  • श्रेयस अय्यर (४२१),

  • केएल राहुल (३४७),

  • शुभमन गिल (२७०).

जसप्रीत बुमरा (१७ विकेट), रवींद्र जडेजा (१६), मोहम्मद शमी (१६), कुलदीप यादव (१४), मोहम्मद सिराज (१२)

पॉवर प्लेमध्ये सरासरी (फलंदाजी)

  • पहिली १० षटके ः भारत ७.१०

  • ११ ते ४० षटके ः न्यूझीलंड ः ६.३८

  • ४१ ते ५० षटके ः दक्षिण आफ्रिका ः १०.१८

देशांविरुद्ध झालेली शतके

  • ५ ः श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान

  • ४ ः न्यूझीलंड, नेदरलँड्स

  • ३ ः इंग्लंड, ऑस्ट्रेलिया

  • २ ः दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान

  • १ ः भारत

कोण आहे टॉस का बॉस

  • ७ : इंग्लंड,

  • ५ : अफगाणिस्तान,

  • ५ : बांगलादेश,

  • ५ : नेदरलँड्स,

  • ५ : न्यूझीलंड,

  • ४ : ऑस्ट्रेलिया,

  • ४ : भारत,

  • ४ : पाकिस्तान,

  • ४ : श्रीलंका,

  • २ : दक्षिण आफ्रिका.

वानखेडेवर एकमेव लढत न्यूझीलंडचा विजय

वानखेडे स्टेडियमवर बुधवारी भारत-न्यूझीलंड यांच्यात उपांत्य सामना होत आहे, परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे दोन संघ केवळ एकदाच या स्टेडियमवर आमनेसामने आलेले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचे २८१ धावांचे आव्हान ६ विकेटने पार केले होते.

वानखेडेवर भारत-न्यूझीलंड

सामने ः भारत ः २१ न्यूझीलंड ः ३

  • विजय ः भारत १२ न्यूझीलंड ः २

  • पराभव ः भारत ९ न्यूझीलंड १

प्रथम फलंदाजीत विजय

भारत ५ न्यूझीलंड १

धावांचा पाठलाग करताना विजय

भारत ७ न्यूझीलंड १

सर्वाधिक धावसंख्या

भारत ः ३५७ न्यूझीलंड ः ३५८

नीचांकी धावसंख्या

भारत १६५ न्यूझीलंड १५३

न्यूझीलंड (२००७ ते २०१९) आणि इंग्लंड (१९७५ ते १९९२) अशा सलग पाच स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठणारे संघ. न्यूझीलंड एकूण आठ वेळा उपांत्य फेरीत. मात्र त्यापैकी दोनदाच उपांत्य फेरी जिंकण्यात यश.

उपखंडात १९८७, १९९६, २०११ आणि २०२३ मधील विश्वकरंडक स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठणारा भारत एकमेव संघ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT