India vs Pakistan Asia Cup 2022 sakal
क्रीडा

Asia Cup 2022 : IND vs PAK सामन्याचे तिकिटे काही मिनिटांतच गेली विकल्या

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 28 ऑगस्टला होणार

Kiran Mahanavar

India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 28 ऑगस्टला होणार आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते या सामन्यासाठी खूप उत्सुक आहेत. भारत आणि पाकिस्तान या सामन्याच्या तिकीटांची विक्री १५ ऑगस्टपासून सुरू झाली आणि अवघ्या दोन तासांत पहिल्या बॅचची सर्व तिकिटे विकली गेली. काही चाहते भाग्यवान होते की त्यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर तिकिटे मिळाली, तर काहींची निराशा झाली. आशिया कप यापूर्वी श्रीलंकेत होणार होता. पण तेथील राजकीय अस्थिरतेमुळे ही स्पर्धा यूएईला हलवावी लागली. ही स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे विकणाऱ्या प्लॅटिनम लिस्ट या कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'तिकिटांची मागणी खूप आहे. काही तासांतच भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे विकली गेली. आयोजक लवकरच तिकिटांची पुढील तुकडी प्रसिद्ध करतील. आशिया कपच्या उर्वरित सामन्यांच्या तिकिटांची विक्रीही सुरू झाली आहे. दुबईत होणार्‍या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांना किती उत्सुकता आहे, याचा अंदाज यावरून काही चाहत्यांनी तिकिटांसाठी सकाळी 6 वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या. मात्र, सायंकाळी सहा वाजल्यापासून तिकिटांची विक्री सुरू होणार असल्याचे त्यांना नंतर समजले.

मागणी जास्त असल्याने कंपनीने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तिकीटांची विक्री केली. दुबई आणि शारजाहमधील सामन्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन लिंक जारी करण्यात आल्या होत्या. भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी चाहते 6 वाजल्यापासून वेबसाइटवर ऑनलाइन झाले. काही वेळातच 8 हजार लोक तिकिटाच्या प्रतीक्षेत होते. एकाच तिकिटासाठी चाहत्यांना 2 तासांपेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागली. काही वेळा जास्त लोडमुळे वेबसाइट क्रॅश झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT