India vs Pakistan Asia Cup 2022 Super-4 Playing-11 sakal
क्रीडा

Ind vs Pak Playing-11 : जडेजाच्या जागी अक्षराचा निर्णय! ही आहे भारत-पाकची प्लेइंग-11

खराब फॉर्मशी झगडणाऱ्या अनेक स्टार खेळाडूंना रोहित शर्मा बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

Kiran Mahanavar

India vs Pakistan Asia Cup 2022 Super-4 Playing-11 : हाँगकाँगचा 155 धावांनी पराभव केल्यानंतर पाकिस्तान सुपर-4 साठी पात्र ठरला आहे. अशिया कपमधील आणखी एक हाय व्होल्टेज सामना रविवारी खेळल्या जाणार आहे. आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये भारतीय संघ पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला कोणतीही कसर सोडायला आवडणार नाही. त्याचबरोबर खराब फॉर्मशी झगडणाऱ्या अनेक स्टार खेळाडूंना तो बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. भारताची प्लेइंग इलेव्हन अशी असेल.

केएल राहुल पाकिस्तानविरुद्ध कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला जाऊ शकतो. मात्र राहुल त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसत नाही. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीला संधी मिळू शकते. विराट कोहलीने हाँगकाँगविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले आहे. स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळू शकते. सूर्यकुमार यादवने हाँगकाँगविरुद्ध आपण काय करू शकतो हे दाखवून दिले. सूर्यकुमार यादव हा भारताचा एबी डिव्हिलियर्स मानले जात आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारताला स्वबळावर विजय मिळवून दिला होता.

कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टीरक्षकाची जबाबदारी दिनेश कार्तिक देऊ शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दिनेश कार्तिकला संधी मिळाली. कार्तिकने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याच्याकडे अफाट अनुभव आहे, जो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो.

कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंगची निवड करू शकतो. या खेळाडूंमध्ये डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची अप्रतिम कला आहे. त्याचवेळी खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या आवेश खानच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते. स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते. दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.

पाकिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रॉफ, इफ्तेकार अहमद, शुशादिल शाह, महम्मद नवाझ, महम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शहनवाझ दहानी, उस्मान कादिर आणि महम्मद हसनैन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: रोज 3 तास ट्रॅफिकमध्ये अडकायचा! आज वडापाव विकून कमावतो लाखो रुपये; मराठी तरुणाने कसा उभारला व्यवसाय?

Pune Crime: लोणी काळभोर हादरले! उघड्या चारीत पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारावर पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : गोसीखुर्द धरणाचे ३ दरवाजे उघडले; वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune Fire News: वेल्डिंगच्या ठिणग्यांनी घेतला रौद्ररूप; मांजरीत दोन दुकाने आगीत खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

Mumbai News: तापामुळे रुग्णालयात दाखल; सकाळी ठाकरे गटाच्या ३२ वर्षीय नेत्याचा संशयास्पद मृत्यू, तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं

SCROLL FOR NEXT