India Vs Pakistan Asia Cup 2022 Suryakumar Yadav Shot During Practice Session Gone Viral  esakal
क्रीडा

VIDEO | IND vs PAK : सूर्यकुमार यादवच्या 'या' शॉटमुळे पाकिस्तानला फुटला घाम

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK Asia Cup 2022 Suryakumar Yadav : आशिया कप 2022 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर करत टीम इंडियाचे आशिया कप अभियान सुरू झाल्याची घोषणा केली. या व्हिडिओत भारतीय संघ सराव करताना दिसते. मात्र या सरावावेळी भारताचा 360 डिग्री प्लेअर सूर्यकुमार यादवने एक अतरंगी शॉट खेळला. या शॉटची सध्या चर्चा होत आहे. या शॉटचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानने देखील धसका घेतला असेल.

बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत विराट कोहली, रोहित शर्मा दिसत आहेत. याचबरोबर आशिया कपची चमचमती ट्रॉफी देखील आहे. बीसीसीआयच्या या व्हिडिओत सूर्यकुमार यादव याच्याबरोबर ऋषभ पंत, दिनेश कार्तिक हे देखील नेटमध्ये घाम गाळताना दिसले. गोलंदाजांमध्ये हार्दिक पांड्या आणि आवेश खान देखील आपल्या गोलंदाजीची धार वाढवताना दिसले.

दरम्यान, सूर्यकुमार यादवबद्दल पाकिस्तानच्या कंपूत खूप चर्चा होत आहे. सूर्यकुमार जर खेळपट्टीवर टिकला तर तो पाकिस्तानसाठी मोठा डोकेदुखी ठरू शकतो. त्यात त्याने सरावावेळी अखूड टप्प्याच्या चेंडूवर अतरंगी शॉट मारत सर्वांना अवाक केले.

विशेष म्हणजे आज विराट कोहलीचा 100 वा आंतरराष्ट्रीय टी 20 सामना आहे. तो भारताकडून तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. तर तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा तो जागतिक स्तरावरील दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या रॉस टेलरने तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑपरेशन टायगर! महाराष्ट्रात राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे गटाच्या ७ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गुप्त बैठक?

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; सोमवारपासून कामगार संघटनेचे घंटानाद आंदोलन, २९ जूनपासून बेमुदत धरणे...

Simcard Safety : मोबाईलचं नेटवर्क अचानक गायब होतंय का? हॅक झालेलं असू शकतंय तुमचं सिमकार्ड, 'या' ट्रिकने लगेच करा चेक

Latest Marathi News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपात गोंधळ; टोकन न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

Vijay Thalapathy Video Karnataka : मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यासोबत कर्नाटकातील टोलनाक्यावर घडली अचंबित घटना, देवदर्शनासाठी जाताना कार स्वतः चालवली

SCROLL FOR NEXT