India vs Pakistan Asia Cup Hockey 2022 
क्रीडा

Asia Cup Hockey : भारत-पाकिस्तानमध्ये आज सलामी

बिरेंद्र लाक्राच्या नेतृत्वाखालील गतविजेता संघ सज्ज

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Pakistan Asia Cup Hockey 2022: आशियाई करंडक स्पर्धेतील विजेतेपद राखण्यासाठी येथे आलेल्या भारताच्या हॉकी संघाची लढत सोमवारी सलामीच्याच सामन्यात पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. अनुभवी बिरेंद्र लाक्राच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार असून एस. व्ही. सुनीलकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

टोकियो ऑलिंपिक खेळातील स्टार परफॉर्मर सिमरनजीत सिंगने दुखापतीमुळे दीर्घकाळ विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन केले आहे. संघाला दोन वेळचे ऑलिंपियन आणि माजी कर्णधार सरदार सिंग हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा आणि पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडकाच्या व्यस्त हंगामापूर्वी आशियाई करंडकात भारताला आपली ‘बेंच स्ट्रेंथ’ तपासण्याची चांगली संधी आहे.

दुसरीकडे, पाकिस्तान या स्पर्धेतून भुवनेश्वर येथे होणाऱ्या २०२३ च्या विश्वकरंडकासाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने येथेच २०१७ मध्ये झालेला शेवटचा हंगाम जिंकला होता, तर ढाका येथे झालेल्या विश्वकरंडक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा २-१ असा पराभव केलेला होता. भारत-पाकिस्तान १७७ वेळा समोरासमोर आलेले असून त्यातील ८२ सामन्यांत पाकिस्तानने, तर ६४ सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT