India vs Pakistan sakal
क्रीडा

India vs Pakistan : पाकिस्तानने तब्बल 8 वर्षांनी भारताचा Asia Cup मध्ये केला पराभव

दुबई येथे खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या सुपर 4 मध्ये पाकिस्तानने भारताचा 5 विकेट्सने केला पराभव

Kiran Mahanavar

India Vs Pakistan Asia Cup 2022 : दुबई येथे खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या सुपर 4 मध्ये पाकिस्तानने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला. पहिल्यांदा खेळताना भारतीय संघाने 20 षटकात 7 विकेट गमावत 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने 20 चेंडूत 42 धावांची तुफानी खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटने सहा चौकार आणि दोन षटकार मारले.

आशिया कपमध्ये विशेष म्हणजे 8 वर्षांनंतर पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. यापूर्वी 2014 मध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध आशिया कप जिंकला होता. सलग पाच पराभवांनंतर आता पाकिस्तानचा कुठे विजय झाला आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 31 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा 16 चेंडूत 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुल 28 धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने 13, ऋषभ पंतने 14 धावा करून बाद झाले. हार्दिक पांड्या खाते न उघडताच बाद झाला. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 181 धावा केल्या.

प्रत्युत्तरात पाकिस्तानने 1 चेंडू शिल्लक असताना 5 गडी गमावत 182 धावा करून सामना जिंकला. 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या बाबर आणि रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी 22 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. बाबर 14 धावा करून बाद झाला. फखर जमानने 18 चेंडूत 15 धावा केल्या. मोहम्मद नवाज झंझावाती खेळी खेळून बाद झाला. त्याने 20 चेंडूत 42 धावा केल्या. मोहम्मद रिझवान 71 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT