India vs Pakistan in U-19 Asia Cup  sakal
क्रीडा

Ind vs Pak : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा रंगणार क्रिकेटचा सामना! BCCI ने केली टीम इंडियाच्या शेड्यूलची घोषणा

Kiran Mahanavar

India vs Pakistan in U-19 Asia Cup : अलीकडेच 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ मैदानावर आमनेसामने येणार आहेत. मात्र यावेळी हा सामना सिनियर नसून ज्युनियर संघांमध्ये होणार आहे.

टीम इंडियाचा ज्युनियर अंडर-19 संघ 8 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान आशिया कप खेळणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये खेळली जाणार आहे. बीसीसीआयने त्यासाठी संघाची घोषणा करताना, संपूर्ण वेळापत्रकही शेअर केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कधी होणार सामना?

आठ वेळचा चॅम्पियन भारतीय संघ या स्पर्धेत फेव्हरिट असणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, यूएई, जपान, श्रीलंका आणि बांगलादेश हे देशही सहभागी होणार आहेत.

भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना 8 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 डिसेंबरला सामना रंगणार आहे.

या स्पर्धेत प्रत्येकी चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन सामने खेळणार आहे. यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने 15 डिसेंबरला होतील, त्यानंतर अंतिम सामना 17 डिसेंबरला होईल.

टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक

  • 8 डिसेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान

  • 10 डिसेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान

  • 12 डिसेंबर – भारत विरुद्ध नेपाळ

  • 15 डिसेंबर - दोन्ही उपांत्य फेरीचे सामने

  • 17 डिसेंबर - अंतिम सामना

अंडर-19 आशिया कपसाठी भारतीय संघ : अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार, मुर्गन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड, आराध्या शुक्ला, नमम तिवारी, राज लिंबानी.

राखीव खेळाडू : प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन

संघाबरोबर प्रवास न करणारे राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विग्नेश, किरण चोरमले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT