क्रीडा

IND vs PAK Weather : क्रिकेटप्रमींसाठी आनंदाची बातमी; अखेर सूर्यनारायण प्रसन्न झाला!

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK Weather Update : आशिया कपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना, भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे ढग दाटण्याची शक्यता वर्तवल्यामुळे सर्व क्रिकेट प्रेमींची निराशा झाली होती. तसंही भारत - पाकिस्तान सामन्याची मेजावणी सारखी सारखी नसते. त्यात पाऊस चाहत्यांच्या आनंदावर पाणी तर फेरणार नाही ना अशी भीती आशिया कपच्या सामन्यापूर्वी व्यक्त केली जात होती.

मात्र आता क्रिकेट रसिकांवर सूर्यनारायण प्रसन्न झाला आहे. पल्लिकेलेचे आकाश निरभ्र झाले असून सूर्याचे दर्शन झाल्याने भारत - पाकिस्तान सामन्याची नाणेफेक ठरल्या वेळेनुसारच होण्याची शक्यता वाढली आहे.

आशिया कपच्या हाय व्होल्टेज सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. काल (दि. 1 सप्टेंबर) दोन्ही संघांनी एकत्र फ्लड लाईट्समध्ये सराव केला होता. मात्र सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सामना होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.

आज कँडी येथील वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर साधारण संध्याकाळी 5 च्या सुमारास पाऊस देखील पडणार असल्याचा अंदाज अॅक्युवेदर डॉट कॉमने वर्तवला आहे. स्थानिक वेळेनुसार सामना हा दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. श्रीलंकाच्या हवामान विभागानुसार कॅडी येथे जवळपास 60 टक्के पावसाची शक्यता आहे. तर 98 टक्के ढगाळ वातावरण राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT