IND vs PAK VIDEO  esakal
क्रीडा

IND vs PAK : धक्कादायक! भारत - पाक सामन्यादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; VIDEO होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK VIDEO : वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ऐतिहासिक अशा नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. अपेक्षेप्रमाणे भारताने पाकिस्तानचा पुन्हा एकदा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारतीय संघाने सांघिक खेळाचा उत्तम नमुना पेश करत जागतिक क्रिकेटमधील आपला दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला.

मात्र नरेंद्र मोदी स्टेडियमवर काही असे प्रकार देखील घडले ज्यामुळे भारताची प्रतिमा जागतिक पातळीवर मलीन झाली. मग त्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची मैदानावर एन्ट्री होत असताना चाहत्यांनी काढलेले विचत्र आवाज असो वा मोहम्मद रिझवान बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना दिलेल्या जय श्री रामच्या घोषणांचा समावेश होता. मात्र यापेक्षाही भयानक गोष्ट नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडली.

आयसीसीच्या 12 व्या सामन्यादरम्यान स्टेडियममधील एका चाहत्याची आणि त्याच चाहत्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची बाचाबाची झाली. ही बाचाबाची थेट मारामारीपर्यंत गेली.

व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे रागाच्या भरात प्रेक्षकाने महिला पोलीस कर्मचाऱ्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. यानंतर चिडलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने या प्रेक्षकाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर चिडलेल्या प्रेक्षकाने पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलला. मात्र शेजारील व्यक्तीने त्याला थांबवत शांत करण्याचा प्रयत्न केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT