India vs Pakistan sakal
क्रीडा

IND vs PAK : भारत-पाक सामना पाहताना 34 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

भारत-पाकिस्तानच्या सामन्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते...

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Pakistan : कधीही न विसरता येणारा क्रिकेट सामना रविवारी मेलबर्नमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने 90 हजार प्रेक्षकांसमोर पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह त्याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरुवात केली. दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ दाखवला. दरम्यान भारतामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

आसामच्या शिवसागर जिल्ह्यात रविवारी भारत-पाकिस्तान टी-20 क्रिकेट सामना पाहताना एका 34 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सामना पाहत असताणा तो व्यक्ती अचानक बेशुद्ध झाला आणि खाली पडला. मृताच्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बिटू गोगोई असे मृताचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट सामन्यादरम्यान सिनेमागृहात निर्माण झालेल्या प्रचंड आवाजाच्या प्रदूषणामुळे बिटूला हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT