T20 World Cup : IND vs PAK sakal
क्रीडा

IND vs PAK T20 World Cup : क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी! भारत-पाक सामना होणार रद्द ?

टी-20 वर्ल्ड कप 2022 सुरू होताच भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

Kiran Mahanavar

India vs Pakistan T20 World Cup 2022 Updates : टी-20 वर्ल्ड कप 2022 सुरू होण्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर आमनेसामने येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 आणि ऑस्ट्रेलियन वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. चाहते या शानदार सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत पण हा सामना रद्द होऊ शकतो.

भारत-पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्यावर संकटाचे ढग फिरू लागले आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणारा हा सामना मुसळधार पावसामुळे रद्द होऊ शकतो. 23 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार पावसामुळे त्या दिवशी टॉस करणे देखील कठीण मानले जात आहे.

सामना खेळला नाही तर काय होईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतील. यासंदर्भात आयसीसीने यापूर्वीच सूचना जारी केल्या आहेत. सुपर 12 टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नसल्यामुळे हा सामना दुसऱ्या दिवशी खेळला जाणार नाही. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजयाचा विक्रम 5-1 असा आहे. गेल्या वर्षी T20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता.

  • भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

    राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर

  • पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद

    राखीव खेळाडू : उस्मान कादिर, मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT