India vs Pakistan U-19 Asia Cup sakal
क्रीडा

Ind vs Pak : पाकविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव! बीडच्या पठ्ठ्याची खेळी व्यर्थ, 8 विकेटने लोळवलं

Kiran Mahanavar

India vs Pakistan U-19 Asia Cup : दुबईत सुरु असलेल्या अंडर-19 आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानकडून दारूण पराभव पत्करावा लागला आहे. भारताच्या या युवा संघाचा पाकिस्तानकडून 8 विकेट्सने पराभव झाला आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने अवघ्या दोन विकेट्स गमावून सहज लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून मोहम्मद झीशानने शानदार गोलंदाजी केली आणि अझान अवैसने शानदार शतक झळकावले.

अ गटातील या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामी जोडीने संथ आणि स्थिर सुरुवात दिली. भारतीय संघाला 9व्या षटकात एकूण 39 धावांवर पहिला धक्का बसला. अर्शीन कुलकर्णीला (24) अमीर हसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दूसरा धक्का पण लवकर बसला.

येथून आदर्श सिंग आणि कर्णधार उदय शरण यांनी तिसऱ्या विकेटसाठी 120 चेंडूत 93 धावांची भागीदारी केली. भारतीय संघ येथे चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत होते. मात्र आदर्श सिंग (62) पॅव्हेलियनमध्ये परतताच पाठीमागे विकेट पडू लागल्या. मुशीर खान (2), आर्वेली अवनीश (11) स्वस्तात बाद झाले.

यानंतर कर्णधार उदय शरण आणि बीडच्या सचिन धसने 48 धावा जोडत संघाला 200 च्या पुढे नेले. 206 च्या एकूण धावसंख्येवर 60 धावा करून उदय बाद झाला. इथून सचिन एका टोकाला उभा राहिला पण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. मुरुगन अभिषेक (4), राज लिंबानी (7) विशेष काही करू शकले नाहीत. शेवटच्या षटकात सचिन दास 58 धावा करू आऊट झाला. सौम्या पांडे (8) आणि नमन तिवारी (2) नाबाद राहिले.

अशाप्रकारे भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 259 धावा केल्या. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद जीशानने 10 षटकात 46 धावा देत 4 बळी घेतले. अमीर हसन आणि उबेद शाह यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले. अराफत मिन्हासने एक विकेट घेतली.

260 धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. शामील हुसैनू (8) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. 28 धावांवर पहिला धक्का बसला पण त्यानंतर पाकिस्तानचा डाव इतका सावरला की उर्वरित सामन्यात त्याचे वर्चस्व पाहिला मिळाला. दुसऱ्या विकेटसाठी शाजेब खान आणि अझान अवेस यांच्यात 110 धावांची भागीदारी झाली. शजेब (63) एकूण 138 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

येथून अझानने कर्णधार साद बेगसह 125 धावांची नाबाद भागीदारी करत पाकिस्तानला विजयाकडे नेले. यादरम्यान अझानने 130 चेंडूत 105 धावांची शतकी खेळी खेळली. तर साद बॅगने 51 चेंडूत 68 धावा केल्या. भारताकडून फक्त मुरुगन अश्विनला विकेट मिळाली. पाकिस्तानने अवघ्या 47 षटकांत विजयाचे लक्ष्य गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Address: विराट-अनुष्का यांचा लंडनमधील पत्ता सापडला? माजी इंग्लिश खेळाडूने दिली हिंट

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

Latest Maharashtra News Updates : देवदर्शनाच्या रांगेत महिलेचे मंगळसूत्र लंपास

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत आकाशातून कोसळला लोखंडी तुकडा? चौकशीत उलगडा

SCROLL FOR NEXT