IND vs PAK World Cup 2023 esakal
क्रीडा

IND vs PAK World Cup 2023 : भारत - पाक वर्ल्डकप सामन्यात सर्वाधिक विकेट्स आहेत कोणाच्या नावावर?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 मध्ये सुपर शनिवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहे. भारताचे वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरूद्धचे रेकॉर्ड हे दमदार आहे. भारत आणि पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये एकमेकांशी 7 वेळा भिडले आहेत. त्यातील 7 ही वेळा भारताने विजय मिळवला आहे.

भारत - पाकिस्तान सामन्याकडे भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी यातील लढत म्हणून देखील पाहिलं जातं. मात्र वर्ल्डकपमधील कहानी काही वेगळंच सांगून जाते. पाकिस्तानकडे वेगवान गोलंदाजांची एक समृद्ध परंपरा आहे. मात्र तरी देखील वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांची कामगिरी सुमारच राहिली आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये भारत - पाकिस्तान सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत भारतीय गोलंदाजांनीच आपला दबदबा निर्माण केला आहे. भारत - पाक वर्ल्डकप सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत 8 विकेट्स घेत व्यंकटेश प्रसाद अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर भारताच्याच जवागल श्रीनथने 7 विकेट्स घेत दुसऱे स्थान पटकावले.

पाकिस्तानचा वहाब रियाजने देखली भारत पाकिस्तान वर्ल्डकप सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर अनिल कुंबळे आणि मुश्ताक अहमदने 5 विकेट्स घेतल्या आहेत.

वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने पाकिस्तानविरूद्ध वर्ल्डकपमध्ये 313 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने 193 धावा केल्या आहेत.

सईद अन्वरने भारताविरूद्ध वर्ल्डकपमध्ये 185 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माच्या 155 धावा झाल्या आहेत. त्या खालोखाल मिसबाह उल हकचा नंबर लागतो. त्याने भारताविरूद्ध वनडे वर्ल्डकपमध्ये 132 धावा केल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT