India vs Pakistan World Cup  
क्रीडा

Ind vs Pak WC 2023: भारत-पाक सामन्याआधी अहमदाबादमधील हॉटेलनंतर आता विमान प्रवास भाडेवाढीची ‘उड्डाणे’

सकाळ वृत्तसेवा

Ind vs Pak WC 2023 : भारतातील एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानकडून अजून आढेवेढे घेण्यात येत असले, तरी देशातील आणि जगभरातील प्रेक्षक मात्र अहमदाबादमध्ये होणाऱ्या भारत-पाक साखळी सामन्याच्या तयारीसाठी केव्हापासूनच लागले आहेत. एकीकडे हॉटेलचे भाडे अव्वाच्या सव्वा वाढत असताना आता विमान प्रवासाच्या भाड्यानेही मोठी ‘उड्डाणे’ सुरू केली आहेत.

या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत भारत-पाक साखळी सामना १५ ऑक्टोबर रोजी नियोजित आहे. ज्या दिवशी आंतरराषट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) यांनी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले, त्या क्षणापासून अहमदाबमधील हॉटेल रूमसाठी प्रचंड प्रमाणात मागणी वाढली. त्यामुळे हॉटेल मालकांनी किती तरी पटीने अधिक रक्कम लावली, तरीही हातोहात हॉटेल रूम फुल्ल झाले.(After hotel tariffs airfare soars for India vs Pak match)

आता या क्रिकेट प्रेक्षकांनी विमान तिकिटे आरक्षित करण्यासाठी आपला मोर्चा वळवला. सामन्याचा आदला दिवस म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी दिल्ली ते अहमदाबाद किंवा मुंबई ते अहमदाबाद या एका मार्गासाठी आता १५ ते २२ हजार रुपये इतकी तिकीट रक्कम झाली आहे. साधारतः तीन महिने अगोदर आरक्षण करत असताना विमान प्रवासाचे भाडे कमीत कमी असते. तरीही भाववाढीची ही उड्डाणे आतापासूनच सुरू झाली आहेत.

अहमदाबादमधील याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वकरंडक स्पर्धेचा उद्‍घाटन आणि अंतिम सामनाही होणार आहे, परंतु सर्वाधिक मागणी भारत-पाक सामन्यासाठी आहे. आयसीसीसी आणि बीसीसीआय यांनी वेळापत्रक जाहीर करून स्पर्धेची तयारी सुरू केलेली असली, तरी पाक मंडळ आणि त्यांचे सरकार नाकदुऱ्या काढत आहे.

पाकचे सामने नियोजित असलेल्या शहरांमध्ये त्यांचे सुरक्षा पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे. त्यांच्या अहवालावर त्यांचे सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. पाकचे साखळी सामने भारतातच नव्हे तर इतर देशांत खेळवावेत, अशीही मागणी त्यांच्याकडून अधूनमधून करण्यात येत आहे, परंतु कितीही खोड काढण्याचा प्रयत्न केला, तरी पाकला भारतात येऊन या विश्वकरंडक स्पर्धेत खेळावे लागणारच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT