India vs South Africa 1st T20 team india playing 11 r ashwin may replace yuzvendra chahal 
क्रीडा

IND vs SA: टीम इंडीयाच्या प्लेंइग 11मध्ये मोठा फेरबदल, 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

सकाळ डिजिटल टीम

India vs South Africa 1st T20: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज (28 सप्टेंबर) होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग 11 वर असणार आहेत. टीमचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2022 च्या पार्श्वभूमीवर या सामन्यात अनेक मोठे बदल करू शकतो. संघाचा जादुई फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या जागी अनुभवी खेळाडूला संधी मिळू शकते.

हा खेळाडू घेऊ शकतो चहलची जागा

टीम इंडियाचा गोलंदाज युजवेंद्र चहल अलीकडच्या काळात फ्लॉप ठरला आहे. आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याला आपली छाप सोडता आलेली नाहीये, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये त्याच्या जागी अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला संधी मिळू शकते. आर अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धची संपूर्ण मालिकेत त्याला बेंचवर बसवण्यात आले होते.

युझवेंद्र चहलचा ऑस्ट्रेलिया मालिकेत सलग प्लेंइग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. या मालिकेत युझवेंद्र चहलने 3 सामन्यात 9.12 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आणि त्याला फक्त 2 विकेट घेता आल्या. ही खराब कामगिरी पाहता रोहित शर्मा आर अश्विनला संधी देऊ शकतो. आर अश्विन 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा देखील एक भाग आहे.

आर अश्विनने टीम इंडियासाठी 56 टी-20 सामन्यात 66 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर तो भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत आगामी सामन्यांच्या कर्णधाराने आर अश्विनला संघात संधी दिली तर तो संघासाठी मोलाचा खेळाडू सिध्द होऊ शकतो.

पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि रविचंद्रन अश्विन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder : आयुष कोमकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या, कोण आहे गणेश काळे, कसं संपवलं?

Latest Marathi News Live Update : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांकडून ६ वैद्यकीय मोबाईल युनिट्सना हिरवा झेंडा

Girish Mahajan : जळगाव महापालिकेत यंदा भाजप 'रेकॉर्ड ब्रेक' कामगिरी करणार; विरोधी पक्षात कोणी उरले नाही: गिरीश महाजन

Water Supply Cut: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १८ तास पाणीबाणी, कधी अन् कुठे?

Dhule News : धुळे ग्रामीणला मोठा दिलासा! अतिवृष्टीग्रस्त १६ हजार शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी १० हजारांचे विशेष पॅकेज मंजूर

SCROLL FOR NEXT