SA vs IND 1st T20  
क्रीडा

SA vs IND 1st T20 : मालिकेचा पहिला टी-20 सामना होणार रद्द? दक्षिण आफ्रिकेतून मोठी बातमी आली समोर

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील टी-20 मालिकेची प्रतीक्षा संपली...

Kiran Mahanavar

India vs South Africa 1st T20I Weather Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील टी-20 मालिकेची प्रतीक्षा संपली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात शानदार कामगिरी केल्यानंतर परदेशात छाप पाडण्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज झाली आहे.

दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला टी-20 सामना डर्बनमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. मात्र मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डर्बन येथे होणाऱ्या सामन्यावर पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान 75 टक्के पावसाची शक्यता आहे.

Accuweather अॅपनुसार रविवारी डर्बनच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामना सुरू होण्यापूर्वी तसेच सामन्यादरम्यान पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, डर्बनमध्ये तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

टीम इंडियाने आतापर्यंत डरबनच्या किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर 5 टी-20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियाने यापैकी एकही सामना गमावलेला नाही. या 5 सामन्यांपैकी टीम इंडियाने 4 सामने जिंकले असून 1 सामना अनिर्णित राहिला आहे. 2007 मध्ये भारताने पाकिस्तानचा बाउल आउटमध्ये 3-0 ने पराभव केला होता, हा सामना देखील याच मैदानावर खेळला गेला होता.

दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेत दोन्ही संघांमध्ये 7 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 5 टी-20 सामने जिंकले आहेत आणि फक्त 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्याचवेळी, दोन्ही संघ टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 24 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने 13 वेळा विजय मिळवला असून 10 सामने दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहेत. एक सामनाही अनिर्णित राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : मकर संक्रांतीला सोनं खरेदी करायचा विचार करताय? आधी आजचे भाव पाहा आणि मग खरेदी करा

Kolhapur Missing Ex Sarpanch : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती? कोल्हापुरातील माजी सरपंच बेपत्ता, जंगलात जळालेली हाडे सापडली अन्

वास्तव की भ्रम? मानसशास्त्रीय थ्रिलर ‘केस नं. ७३’मध्ये अशोक शिंदेंचा दमदार कमबॅक

WPL 2026 : मुंबई इंडियन्स, RCB च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; नवी मुंबईतील सामन्यांत ३ दिवस प्रेक्षकांना परवानगी नाही, कारण...

Pune Temperature : पुण्यात तापमानाचा विचित्र खेळ; दहा किलोमीटरच्या अंतरात तब्बल सहा अंशांपर्यंतची तफावत

SCROLL FOR NEXT