Ranchi ODI Tickets IND vs SA :  sakal
क्रीडा

Video : रांचीमधील चाहते इतके संतापले की BCCI विरोधात केली नारेबाजी; काय आहे कारण

हैदराबादनंतर रांचीमधील तिकीट वाटपाच्या प्रक्रियेवर चाहते नाराज

Kiran Mahanavar

Ranchi ODI Tickets IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी चाहते भारतीय क्रिकेट बोर्डावर (BCCI) इतके संतापले की त्यांनी नारेबाजी केली. अनेक चाहत्यांनी घरच्या मालिकेदरम्यान बीसीसीआयच्या गैरव्यवस्थापनावरही निशाणा साधला.

क्रिकेट चाहत्यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयच्या घरच्या मालिकेदरम्यान केलेल्या गैरकारभारावर निशाणा साधला आहे. चाहत्यांनी जेएससीए आणि बीसीसीआयवर टीका केली आहे. रांचीमधील मालिकेच्या दुसऱ्या वनडेसाठी तिकीट मिळविण्याच्या त्रासदायक प्रक्रियेबद्दल तक्रार केली आहे. काहींनी आपली फसवणूक झाल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर घोषणाबाजी करण्यात आली.

रांचीमधील चाहते तिकीट वाटपाच्या प्रक्रियेवर नाराज झाले. हैदराबादमध्येही तेच पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांना तेथे हस्तक्षेप करावा लागला. काही चाहते जखमी झाल्याचेही वृत्त आहे. रांची वनडेसाठी तिकीट खरेदी प्रक्रियेबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या आधी चाहते तिकीट खरेदीसाठी लांब रांगेत उभे असलेले दिसले. भारतीय संघ सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेत टीम इंडियाला नऊ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT