India vs South Africa 3rd ODI raining incessantly delhi ahead the last odi match cricket sakal
क्रीडा

IND vs SA : मुसळधार पावसात दिल्लीत पोहोचली टीम इंडिया, आज मालिकेचा निर्णायक सामना

नवी दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

India vs South Africa 3rd ODI : कधी नव्हे इतकी चांगली कामगिरी प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांनी केली त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा सामना जिंकून बरोबरी साधती आली. आता या कामगिरीत सातत्याची गरज आहे; तरच आजच्या तिसऱ्या सामन्यासह भारताकडे मालिकाही जिंकण्याची संधी असेल.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर चांगली प्रगती केली. गोलंदाजांच्या यशावर शतकवीर श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी विजयाचा कळस चढवला, त्यामुळे रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात सहज विजय मिळवला आला होता.

दोन सामन्यांतील कामगिरी लक्षात घेता भारतीय सलामीवीर अपयशी ठरलेले आहेत. कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांना प्रभाव पाडता आलेला नाही, त्यामुळे मधल्या फळीवर दडपण आलेले आहे. कालच्या सामन्यात श्रेयस आणि ईशान यांनी विजयाची नाव पैलतीरावर लावली, परंतु आता तिसऱ्या सामन्यात या दोघांना योगदान द्यावे लागणार आहे. पुढील वर्षी भारतात एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. स्पर्धेला अजून बराच कालावधी असला, तरी धवनला आपली उमेदवारी कायम ठेवण्यासाठी मिळेल त्या संधीचे सोने करावे लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेची मधली फळी चांगल्या फॉर्मात आहे. रविवारच्या सामन्यात त्यांच्याकडून सुरुवात चांगली झाली होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी मोठी खेळी करण्यापासून प्रामुख्याने डेव्हिड मिलर आणि क्लासेन यांना रोखले होते. मिलर-क्लासेन यांचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. एडन मार्करमही फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना निष्काळजी राहून चालणार नाही.

पावसावर सामन्याचे भवितव्य

नवी दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. आजही वादळी पावसाचे भाकित करण्यात आले आहे, त्यामुळे मालिकेसाठी निर्णायक असलेल्या या सामन्याचे भवितव्य पावसावर असणार आहे. व्यत्यय येत राहिला तर पूर्ण 50 षटकांचा खेळ होणे कठीण असे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT