India vs South Africa 
क्रीडा

IND vs SA : गोलंदाजानी बुडवली टीम इंडियाची बोट, हे आहे पराभवाची कारणे

भारताकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक धावा केल्या

Kiran Mahanavar

India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 49 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. रिले रुसोने 48 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 18.3 षटकांत 178 धावांवर गारद झाला. भारताकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक 41 धावा केल्या.

मात्र, या पराभवाचा मालिकेच्या निकालावर परिणाम झाला नाही, भारताने याआधीच मालिका 2-1 ने जिंकली आहे. टीम इंडियाने पहिला टी-20 आठ विकेटने आणि दुसरा टी-20 16 धावांनी जिंकला. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची टी-20 मालिका होती.

टीम इंडियाने लक्ष्याचा पाठलाग करताना लवकर विकेट्स गमावणे

दक्षिण आफ्रिकेकडून 228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. संघ कधीही लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या स्थितीत दिसत नाही. अखेरीस 18.3 षटकात 178 धावांवर आटोपला. भारताकडून दिनेश कार्तिकने 46 धावा केल्या.

विराट अन् राहुलला ब्रेक

भारतीय संघ या सामन्यात उपकर्णधार लोकेश राहुल आणि विराट कोहलीशिवाय खेळायला उतरला. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि दुसऱ्याच षटकातच संघाची धावसंख्या दोन विकेट्सवर चार धावा अशी झाली.

सूर्यकुमारच्या फलंदाजीच्या ऑर्डर मध्ये केला बदल

या सामन्यात सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला, आठ धावा केल्यानंतर ड्वेन प्रिटोरियसच्या चेंडूवर तो स्टब्सकरवी झेलबाद झाला. ज्यामुळे भारताची धावसंख्या पाच बाद 86 अशी झाली. भारताने 11व्या षटकात शतक पूर्ण केले. हर्षल पटेल (17) ने न्गिडीच्या चेंडूवर एक चौकार आणि षटकार खेचला पण नंतर तो मिलरकरवी झेलबाद झाला. पारनेलने अक्षर पटेलला (09) यष्टिरक्षक डी कॉककडे झेलबाद करून भारताला सातवा धक्का दिला.

रिले रुसोचे शतक

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 30 धावांवर पहिली विकेट गमावली. मात्र यानंतर रुसोने 48 चेंडूत आठ षटकार आणि सात चौकारांसह नाबाद 100 धावा केल्या, याशिवाय डी कॉक (68) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 90 आणि ट्रिस्टन स्टब्स (23) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 87 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने द. तीन गड्यांच्या मोबदल्यात 227 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT