India vs Sri lanka T20 Series 
क्रीडा

IND vs SL: 360 डिग्री सूर्या घरच्या मैदानावर करणार टोलेबाजी! पण सलामीला कोण खेळणार?

सलामी आणि गोलंदाजी... टीम इंडिया या उत्तरांचा शोध घेणार श्रीलंका मालिकेत!

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Sri lanka T20 Series : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रित बुमरा, रवींद्र जडेजा असे वरिष्ठ खेळाडू या ना त्या कारणामुळे संघात नाहीत. त्यामुळे ट्वेन्टी-२० साठी नवा संघ नववर्षात तयार होत आहे आणि त्यांची पहिली लढाई मुंबईत श्रीलंकेविरुद्ध आज होत आहे. टीम इंडियाचा भविष्यातील व्हाईट बॉल क्रिकेटमधील कर्णधार म्हणून छाप पाडण्यासाठी हार्दिक पंड्या करितासुद्धा ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

भारतात याच वर्षात मर्यादित

षटकांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. श्रीलंकेविरुद्ध होणारी ट्वेन्टी-२० आणि ५०-५० षटकांच्या मालिका तयारीचे पहिले पाऊल ठरणारी आहे. किमान ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये संघ व्यवस्थापन नवा संघ उभारणीचा विचार करत आहे आणि त्याची सुरुवात आजपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेद्वारे होणार आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेले खेळाडू अधूनमधून संघात होते; परंतु वरिष्ठ खेळाडूंची छत्रछाया नसताना हे खेळाडू कशी कामगिरी करतात यावर भविष्यातील संघ उभारणीची रचना ठरणार आहे.

दासून शनाकाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या श्रीलंकेने भारताचा पराभव करून आशिया कप टी-२० स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आणले होते. त्या पराभवाची परतफेड करणार का, या प्रश्नावर हार्दिक हसत हसत म्हणाला, "परतफेड करण्यापेक्षा आमची ताकद दाखवण्यासाठी आम्ही खेळणार आहोत. मायदेशात आम्हाला हरवणे सोपे नसते हे आम्ही सिद्ध करू"

  • ऋतुराज की गिल ?

    भारतीय संघात सलामीच्या जोडीपासून ते वेगवान गोलंदाजीपर्यंत मोहरे बदलणार आहेत. रोहित-राहुल ही जोडी नसल्यामुळे आता ईशान किशन, त्याच्या साथीला शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड असे पर्याय आहेत. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात झंझावाती द्विशतक करून ईशानने आपले स्थान पक्के केले आहे.

  • सूर्या घरच्या मैदानावर खेळणार

    ३६० डिग्री फलंदाज (सभोवार टोलेबाजीची क्षमता) म्हणून नावलौकिक मिळवणारा सूर्यकुमार यादव घरच्या मैदानावर (वानखेडे स्टेडियम) प्रथमच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहे. येथील सीमारेषा, खेळपट्टी, त्याच्या चांगलीच जवळची असल्यामुळे त्याच्यावर सर्वांचे लक्ष असेल.

  • नवे वेगवान गोलंदाज

    शिवम मावी आणि मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अर्षदीप, हर्षल पटेल आणि उमरान मलिक असतील. या तिघांकडे बऱ्यापैकी अनुभव आहे. या मालिकेत मावी आणि मुकेश कुमार यांना किती संधी मिळते हे महत्त्वाचे ठरणार आहे. युझवेंद्र चहल पहिल्या पसंतीचा फिरकी गोलंदाज असेल, तर अक्षर पटेलऐवजी वॉशिग्टन सुंदरला प्राधान्य मिळेल.

यातून निवडणार संघ :

  • भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार

  • श्रीलंका - दासुन शनाका (कर्णधार), पाथून निसांका, अविष्का फर्नांडो, सादिरा समरविक्रमा, भानुका राजपक्षा, चरिथ असालंका, धनंजय डिसिल्वा, वानिंद हसरंगा, अशीन बंदारा, महेष तीक्शाना, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलांगे, प्रमोद मदशान, लाहिरू कुमारा आणि नुवान तुषारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT