shikhar dhawan  esakal
क्रीडा

WI vs IND 2nd ODI: शिखर धवन विराट विक्रमाच्या उंबरठ्यावर; दोन चौकार अन्...

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, जिथे मालिकेतील पहिल्या वनडेत विजयाने सुरुवात केली

धनश्री ओतारी

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, जिथे मालिकेतील पहिल्या वनडेत विजयाने सुरुवात केली आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला. त्यानंतर आता दुसरी वनडे क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदादमध्ये खेळवण्यात येणार आहे. आवेश खान किंवा अर्शदीप सिंग यांना दुसऱ्या वनडेत संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, टीम इंडियाचा गब्बर म्हणजे शिखर धवन विराट विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.(india vs west indies 2nd odi shikhar dhawan record)

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात, धवन नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. त्यानेे केवळ दोन चौकार ठोकले असता तर वनडेत त्याचे 800 चौकार पूर्ण होतील. धवनने आतापर्यंत 153 वनडेत एकूण 798 चौकार मारले आहेत. 800 चौकार पूर्ण केल्यानंतर भारतासाठी अशी कामगिरी करणारा धवन हा 9वा फलंदाज ठरेल.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 2016 मध्ये एकदिवसीय कारकिर्दीत चौकार मारले होते. यासह धवन त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०५०० धावा पूर्ण करण्यापासून केवळ ४ धावांनी मागे आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार शिखर धवनचे या सामन्यात तीन धावांनी शतक हुकले. त्याने 99 चेंडूत 97 धावांची खेळी खेळली. यादरम्यान शिखरने 10 चौकार आणि तीन षटकार मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT