india vs westindies 2nd t20 live broadcast dd sports ready cricket live broadcast ind vs wi series check details esakal kgm00 
क्रीडा

IND vs WI: इंडिया विरुद्ध वेस्टइंडीज टी-20 सामना कुठे पहायचा माहिती नसेल तर जाणून घ्या...

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना आज सेंट किट्स येथे खेळवला जाणार आहे.

Kiran Mahanavar

india vs west indies : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना आज सेंट किट्स येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाची नजर मालिकेत सलग दुसऱ्या विजयावर असेल. 29 जुलै रोजी त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी यजमानांचा 68 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत पाच टी-20 सामने खेळले आहेत. त्यादरम्यान तीन सामन्यात विजयी तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करायला लागला आहे.

वेस्टइंडीज मध्ये 2017 पासून भारत हरलेला नाही. त्याचा शेवटचा पराभव 2017 मध्ये किंग्स्टन येथे झाला होता. त्यानंतर भारताने सलग दोन सामने जिंकले आहेत. चला जाणून घेऊया या सामन्याच्या प्रक्षेपण कुठे आणि किती वाजता होणार आहे.

  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना कुठे होणार?

    भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज सेंट किट्स येथे खेळवला जाणार आहे.

  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना कधी सुरू होईल?

    भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता होईल आणि पहिला चेंडू रात्री 8 वाजता टाकला जाईल.

  • सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

    भारत-वेस्ट इंडिज मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार फॅनकोड ग्रुपकडे आहेत. हा सामना डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर प्रसारित केला जाईल. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता या मालिकेचे सामने पाहू शकता.

  • थेट सामने कुठे पाहू शकतो?

    भारत-वेस्ट इंडिज मालिकेतील सर्व सामन्यांचे लाईव्ह-स्ट्रीमिंग फॅनकोड अॅप किंवा फॅनकोड वेबसाइटवर भारतात पाहिले जाऊ शकते. याशिवाय तुम्ही https://www.esakal.com/ वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT