India vs West Indies 2nd T20I
India vs West Indies 2nd T20I Sakal
क्रीडा

हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!

सुशांत जाधव

India vs West Indies, 2nd T20I : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानातील दुसरा टी-20 सामना जिंकत टीम इंडियाने टी-20 मालिकाही खिशात घातली आहे. भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सलामी जोडी स्वस्तात माघारी फिरली. पण त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि रावमन पॉवेल (Rovman Powell) या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाच्या विजयाची आस निर्माण केली. पूरन 41 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार खेचून 62 धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यावर सामना भारतीय संघाच्या बाजून वळला आणि टीम इंडियाने तो जिंकलाही.

वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार पोलार्डनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीज गोलंदाजांनी इशान किशन 2 (10) आणि रोहित शर्माला 19(18) बाद करत चांगली सुरुवात करुन दिली. पण विराट कोहली (Virat Kohli) ने त्यांचा प्लॅन उधळला. सूर्यकुमार यादव अवघ्या 8 धावांची भर घालून परतल्यानंतर कोहलीनं दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 41 चेंडूत 52 धावांची खेळी केली. रिषभ पंतच्या (Rishabh Pant) 28 चेंडूतील नाबाद 52 धावा आणि व्यंकटेश अय्यरनं 28 चेंडूत 33 धावा करुन त्याला दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 186 धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज सलामीवीर ब्रँडन किंगने 22 धावांची खेळी केली. कायले मेयर्य 9 धावा करुन बाद झाला. सलामी जोडी परतल्यानंतर निकोलस पूरन 62(41) आणि रावमन पॉवेल 62(36) या जोडीनं शतकी भागीदारी केली. या दोघांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. पण निकोलस बाद झाला आणि सामना भारतीय संघाच्या बाजूनं फिरला. पॉवेल नाबार राहिला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि रवि बिश्नोई यांनी मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT