shikhar dhawan india first time clean sweep sakal
क्रीडा

IND vs WI 3rd ODI : शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी

Ind vs WI: शिखर धवन नेतृत्वात वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देण्याची संधी

Kiran Mahanavar

IND vs WI 3rd ODI : शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाने एकदिवसीय मालिका जिंकली असली, तरी आज होणाऱ्या अखेरच्या लढतीत वेस्ट इंडिजला पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादन करण्यासाठी टीम इंडियाचा प्रयत्न असेल. याचप्रसंगी यजमान वेस्ट इंडिजचा संघ तिसऱ्या लढतीत विजय मिळवून शेवट गोड करण्यासाठी सज्ज असेल. यासह सलग आठ लढतींमध्ये झालेल्या पराभवाची मालिका खंडित करण्यासाठीही वेस्ट इंडिजचा संघ प्रयत्नांची शिकस्त करील.

अक्षर पटेलने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या दे दणादण फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या लढतीत विजय साकारला आणि वेस्ट इंडिजविरुद्ध सलग 12 मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. यामुळे अखेरच्या लढतीत भारतीय संघात बदल होऊ शकतो.

कर्णधार शिखरने मागील लढतीत 97 धावांची खेळी साकारत आपण फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले आहे. शुभमन गिलने पहिल्या दोन लढतींत (107 धावा) चमकदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याला वगळून ॠतुराज गायकवाडला संधी मिळेल, असे वाटत नाही. श्रेयस अय्यरने सलग दोन अर्धशतक झळकाविली आहेत त्यामुळे त्याचे स्थान कायम असू शकेल.

अपटन सहाय्यक स्टाफमध्ये

2011 मध्ये विश्‍वकरंडक जिंकलेल्या भारतीय संघाशी जोडलेले पॅडी अपटन यांची टीम इंडियाच्या सहाय्यक स्टाफमध्ये निवड झाली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून मंगळवारी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT