india vs west indies  sakal
क्रीडा

IND vs WI : तिसरा सामनाही उशिरा होणार सुरू, काल 'लगेज'मुळे अन् आज...

भारतीय वेळेनुसार तिसरा T20 सामना आज रात्री 8 वाजता सुरू होणार होता, मात्र...

Kiran Mahanavar

IND vs WI 3rd T20: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची T20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा सामना आज खेळल्या जाणार आहे. दुसऱ्या T20 सामन्याप्रमाणे या सामन्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार तिसरा T20 सामना आज रात्री 8 वाजता सुरू होणार होता, मात्र त्यात दीड तासाने बदल करण्यात आला आहे. नाणेफेक 9 वाजता होईल तर सामना रात्री 9.30 वाजता सुरू होईल. कालच्या सामन्यात खेळाडूंना आराम मिळाला नाही त्यामुळे हा निर्णय घेतला. बीसीसीआयने स्वतः ही माहिती दिली आहे.

मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या वेळेतही बदल करण्यात आला होता. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार होता, परंतु नाणेफेक तीन तास उशिराने सुरू झाली. संघाचे लगेज (Team Luggage) वेळेवर पोहचणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी सकाळी भारत-वेस्ट इंडिज संघाला अद्याप अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नसल्याची बातमी आली होती. या मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहेत, ज्यासाठी टीम इंडिया तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर रवाना होणार आहे. मात्र अद्यापपर्यंत दोन्ही संघातील खेळाडूंना व्हिसा मिळालेला नाही.

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात 138 धावांवर सर्वबाद झाला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक 31 आणि रवींद्र जडेजाने 27 धावा केल्या. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयने 4 षटकात 17 धावा देत 6 बळी घेतले. प्रत्युत्तरात विंडीज संघाने 5 विकेट्सवर 145 धावा करत सामना जिंकला. सलामीवीर ब्रेंडन किंगने सर्वाधिक 68 धावांची खेळी खेळली. भारताने दुसरा सामना गमावल्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Koyna Dam Rainfall Eases: कोयना धरण पाणलोटात पावसाचा जोर ओसरला; दरवाजे सहा फुटांवरून पाच फुटांवर, विसर्गात कपात

Dhoni - Pant: धोनी चालवत होता गाडी अन् शेजारी बसला होता पंत! कॅप्टनकूलच्या मर्सिडिजमधून एकत्र बाहेर पडतानाचा Video Viral

SCROLL FOR NEXT