india w vs aus w test cricket match lead 157 run smriti richa jemimah deepti sakal
क्रीडा

India W vs Australia W : भारताची आघाडी दीडशे पार; स्मृती, रिचा, जेमिमा, दीप्तीची शानदार अर्धशतके

महिला कसोटी; सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धचाही कसोटी सामना जिंकण्याची स्थिती भारतीय महिला संघाने निर्माण केली आहे. दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ३७६ धावा उभारून १५७ धावांची आघाडी घेतली आहे. सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक आहेत.

वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी सोपी राहिलेली नाही, काही चेंडू अचानक खाली रहात आहेत, तर काही चेंडू वळतही आहेत अशा परिस्थितीत भारतीयांनी घेतलेली दीड शतकी आघाडी वर्चस्व मिळवणारी आहे.

स्मृती मानधना (७४), रिचा घोष (५२) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (७३) यांनी आव्हान स्वीकारत दाखवलेले धैर्य त्यानंतर चार फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यानंतर दीप्ती शर्माने फटकावलेल्या नाबाद ७० धावा आणि तिने पूजा वस्त्रकारसह केलेली नाबाद १०२ धावांची भागीदारी आजच्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरली.

पहिल्या दिवशी मिळवलेली पकड भारतीय महिलांना आज अधिक भक्कम केली. तसे आजच्या तीन सत्रांच्या खेळातील दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाल डोके वर काढण्याची संधी मिळाली होती; परंतु दीप्ती शर्मा आणि वस्त्रकार यांनी तिसऱ्या सत्रात बरोबर १०० धावा फटकावताना एकही विकेट गमावली नाही. त्यामुळे आता उर्वरित खेळात ऑस्ट्रेलियाला बचावासाठी लढावे लागणार आहे.

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रलिया पहिला डाव ः २१९, भारत, पहिला डाव ः ७ बाद ३७६ (शेफाली वर्मा ४०, स्मृती मानधना ७४ - १०६ चेंडू, १२ चौकार, रिचा घोष ५२ - १०४ चेंडू, ७ चौकार, जेमिमा रॉड्रिग्ज ७३ - १२१ चेंडू, ९ चौकार, दीप्ती शर्मा खेळत आहे ७०, पूजा वस्त्रकार खेळत आहे ३३, अॅशले गार्डनर ४१-७-१००-४.)

स्मृतीला फॉर्म सापडला

गेल्या काही सामन्यांत सूर हरपलेल्या स्मृती मानधनाने संघाला मोक्याच्या क्षणी आत्मविश्वासाने ७४ धावांची खेळी केली. काल दिवसअखेर फटकेबाजी करत ती ४३ धावांवर नाबाद होती; परंतु आज वेगळ्या मानसिकतेने सुरुवात करावी लागली.

सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासून एका बाजूने फिरकी आक्रमण सुरू केल्यामुळे स्मृतीला सावध खेळ करावा लागला. तिने ‘नाईट वॉचमन’ म्हणून फलंदाजीस आलेल्या स्नेह राणासह अर्धशतकी भागीदारी केली त्यात राणाचा वाटा अवघ्या ९ धावांचा होता.

स्मृतीकडून शतकाची अपेक्षा होती; परंतु दुर्दैवाने ती धावचीत झाली. पदार्पण करणारी रिचा घोष सुरुवातीला फारच सावध होती. तीसुद्धा धावचीत होताना वाचली होती आणि तिचा एक झेलही सुटला होता; परंतु आत्मविश्वास मिळवत तिने अर्धशतक केले.

जेमिमाकडून स्वीपचा वापर

जेमिमा रॉड्रिग्ज मात्र कमालीची आत्मविश्वासाने खेळत होती. सफाईदारपणे स्वीपचे फटके मारून तिने ऑस्ट्रेलियाचा फिरकी मात्र निष्प्रभ केला. ऑफचे चेंडूही ती स्वीप करत होती. मात्र तीसुद्धा या सुंदर खेळीचे शतकात रूपांतर करू शकली नाही.

भारतीय संघाची आघाडी अर्धशतकापर्यंत गेली असताना फलंदाजीस आलेली हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटीया फारच खाली राहिलेल्या चेंडूवर पायचीत झाल्या. त्यामुळे ३ बाद २६० वरून भारताचा डाव ७ बाद २७४ असा घसरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT