India Wild Champagne Celebration After Series Win 
क्रीडा

Video : मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहितला शॅम्पेनने घातली अंघोळ

विजयाच्या जल्लोषात तल्लीन टीम इंडिया, या अनोख्या पद्धतीने साजरा

Kiran Mahanavar

ENG vs IND : टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत आहे. भारताने तब्बल 8 वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका जिंकली आहे. तिसरा एकदिवसीय सामना रविवारी मँचेस्टर येथे खेळला गेला. टीम इंडियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. सामन्यात गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. त्यामुळे भारताने मालिका 2-1 ने जिंकली.(India Wild Champagne Celebration After Series Win)

टीम इंडियाने इंग्लंडमध्ये इतिहास रचत वनडे सीरिजवर कब्जा केला. सामना जिंकल्यानंतर जेव्हा ट्रॉफी उचलण्याची वेळ आली तेव्हा टीम इंडियाच्या खेळाडूने खास सेलिब्रेशन केल. सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेल्या भारतीय खेळाडूंनी कर्णधार रोहित शर्माला शॅम्पेनने अंघोळ घातली. टीम इंडियाने हा मालिका विजय अनोख्या पद्धतीने साजरा केला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

पंत आणि पांड्या या दोघांनीही कर्णधार रोहितच्या अंगावर जोरदार शॅम्पेन उडवली. विराट कोहलीही या बाबतीत मागे राहिला नाही. त्यानेही एक मोठी बाटली घेतली आणि शिखर धवन आणि सूर्यकुमार यादव यांच्या वर शॅम्पेन जोरात उडवायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान इंग्लंडला 45.5 षटकात केवळ 259 धावा करता आल्या. कर्णधार जोस बटलरने 80 चेंडूत 60 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. टीम इंडियाकडून स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने 4 आणि युझवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या. 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 42.1 षटकात 5 गडी गमावून 261 धावा केल्या आणि सामना जिंकला. ऋषभ पंतने संघासाठी 113 चेंडूत 125 धावांचे शतक केले तर हार्दिक पांड्याने 55 चेंडूत 71 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Latest Marathi News Updates : नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर सुरु

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

SCROLL FOR NEXT