Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : भारतीय शूटर्सचा पदकांचा रतीब सुरूच; भारतीय संघाची रूपेरी कामगिरी

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारताच्या महिला शूटर्सनी आज रूपेरी कामगिरी केली. भारतीय महिला ट्रॅप संघाने एशियन गेम्समध्ये रौप्य पदक पटकावले. भारताच्या मनिषा कीर, प्रिती राजक, राजेश्वरी कुमारी यांनी सांघिक कामगिरी करत भारताच्या पदक तालिकेत अजून एक पदकाची भर घातली. त्यांनी एकूण 337 गुणांची कमाई केली.

भारतीय महिला ट्रॅप शुटिंग संघाने रौप्य पदक जिंकून दिले. याचबरोबर गोल्फमध्ये देखील आदिती अशोकने भारताला रौप्य पदक जिंकून दिले आहे. त्यामुळे एशियन गेम्सच्या आठव्या दिवशी भारताची पदक संख्या ही 40 च्या घरात पोहचली आहे.

भारतीय महिला ट्रॅप शुटिंग संघासोबतच पुरूष संघाने देखील दमदार कामगिरी केली. त्यांनी एशियन गेम्स पुरूष सांघिक ट्रॅप शुटिंग स्पर्धेत विक्रमी 361 गुण मिळवत सुवर्ण पदक जिंकले. भारताचे हे 11 वे सुवर्ण पदक ठरले.

भारताने एशियन गेम्सच्या आठव्या दिवशी आतापर्यंत 11 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कांस्य पदकांची कमाई केली आहे. भारताच्या पुरूष आणि महिला ट्रॅप शुटिंग संघांनी पदकांची कमाई केल्यानंतर वैयक्तिक ट्रॅप शुटिंग इव्हेंटमध्ये देखील अंतिम फेरी गाठली आहे.

पुरूषांमध्ये कयनन चेनाई आणि झोरावर सिंह हे दोघेही अंतिम फेरीत गेले आहेत. तर महिला वैयक्तिक ट्रॅपमध्ये देखील मनिषा कीरने अंतिम फेरी गाठली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT