india women beats thailand  sakal
क्रीडा

Womens Asia Cup : भारताने थायलंडचा पराभव करत मारला विजयाचा 'चौकार', 36 चेंडूत जिंकला सामना

20 षटकांचे लक्ष्य 36 चेंडूत पूर्ण करून भारताने सर्वात मोठा विजय नोंदवला

Kiran Mahanavar

Womens Asia Cup India vs Thailand : महिला आशिया कपमध्ये भारताचा शेवटचा गट सामना थायलंडशी झाला. भारताने थायलंडचा नऊ गडी राखून पराभव करत विजयाचा चौकार मारला आहे. महिला आशिया कपमध्ये भारताने आतापर्यंत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करताना थायलंड संघाने भारतासमोर 38 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने सहा षटकात एक गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

थायलंडविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर खेळली नाही. त्यांच्या जागी स्मृती मानधना यांनी भारतीय संघाची धुरा सांभाळली. हा सामना त्याच्यासाठीही खास होता. मानधनाच्या कारकिर्दीतील हा 100 वा टी-20 होता. या सामन्यात मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसर्‍याच षटकात दीप्ती शर्माने नथकन चँथमला क्लीन बोल्ड केले. यानंतर भारताला दुसऱ्या यशासाठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र प्रतीक्षाचे फळ गोड लागले.

सामन्याच्या 7व्या षटकात थायलंडने लागोपाठ दोन चेंडूत 2 गडी गमावले. स्नेह राणाने चनिदा सुथिरुआंगला क्लीन बोल्ड केले. 20 धावांत 3 विकेट्स गमावल्यानंतर थायलंडचा संघ सामन्यात परतू शकला नाही. पुढील 17 धावांत आणखी 7 विकेट गमावल्या. अशाप्रकारे थायलंडचा संपूर्ण संघ 15.1 षटकात 37 धावांत सर्वबाद झाला. थायलंडची टी-20 मधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताकडून स्नेह राणाने 9 धावांत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय राजेश्वरी गायकवाडने 2 आणि दीप्ती शर्माने 2 बळी घेतले. भारताने 38 धावांचे लक्ष्य 6 षटकात 1 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून एस मेघनाने नाबाद 20 आणि पूजा वस्त्राकरने 12 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT