india women VS bangladesh women 3rd ODI Tie 
क्रीडा

Ind vs Ban: शेवटच्या षटकांच्या नाट्यामुळे एका धावेने हुकली टीम इंडिया! बांगलादेशनेही केला ट्रॉफीवर दावा

सकाळ ऑनलाईन टीम

India Women VS Bangladesh Women : बांगलादेशकडून कधीही मालिका न गमाविणाऱ्या भारतीय महिलांना प्रथमच त्यांच्यासोबत विजेतेपद विभागून घेण्याची वेळ आली आणि तीसुद्धा फलंदाजीत अंतिम क्षणी कच खाल्यामुळे. तीन सामन्यांच्या मालिकेतील आजचा अखेरचा सामना २२५ या धावसंख्येवर टाय झाला. भारतीयांनी अखेरच्या ३४ धावांसाठी सहा फलंदाज गमावले आणि विजेतेपद मिळवण्याची संधी गमावली.

भारत विजयी मार्गावर असताना पाऊस आला. त्यामुळे काही काळ सामना थांबला. त्यावेळी डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारत पुढे होता. परंतु नंतर खेळ सुरू झाला. पावसामुळे खेळ वाया गेल्यामुळे सुपर ओव्हर होऊ शकली नाही. या एकदिवसीय मालिकेत भारताची फलंदाजी चिंतेचा विषय होती. त्यामुळे पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात जेमिमाने भरपाई केली. त्यामुळे १-१ बरोबरी झाली होती. आज ६ बाद २१६ अशी वाटचाल केल्यानंतर अखेर १० धावा करता आल्या नाहीत.

तत्पूर्वी, बांगलादेशने अधिक धावा करण्याऐवजी ५० षटके फलंदाजी करण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांना ४ फलंदाज गमावताना २२५ धावा करता आल्या. फरगाना हकने १०७ धावा केल्या. परंतु त्यासाठी तिने १६० चेंडूंचा सामना केला. एकदिवसीय क्रिकेटमधील हे तिचे पहिले शतक होते. एरवी वर्चस्व राखणाऱ्या भारतीय गोलंदाजांना आज चारच फलंदाज बाद करता आले.

असे घडले नाट्य -

अखेरच्या षटकांत भारताला विजयासाठी सहा चेंडूत ३ धावांची गरज होती. मेघना सिंग आणि जेमिमा यांनी प्रत्येकी एकेक धाव काढली. परंतु तिसऱ्या चेंडूवर मेघना यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाली. यासोबतच भारत आणि बांगलादेश यांच्यात ट्रॉफीही शेअर झाली.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : ५० षटकांत ४ बाद २२५ (शमिमा सुलताना ५२, फरगाना हक १०७ - १६० चेंडू, ७ चौकार, निगर सुलताना २४, शोभना मोस्तारी नाबाद २३, स्नेह राणा २-४५, देविका वैद्य १-४२) बरोबरीत वि. भारत ४९.३ षटकांत सर्वबाद २२५ (स्मृती मानधना ५९, शेफाली वर्मा ४. यास्तिक भाटिया ५. हरलिन देओल ७७, हरमनप्रीत कौर १४, जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद ३३, दीप्ती शर्मा १. अमनज्योत कोर १०, सुलताना खातून १-४९, मारुफा अख्तर २-५५, नाहिदा अख्तर ३-३७)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT