India Women vs Thailand Women Thailand Restrict India in 148 runs in Women's Asia Cup T20 Semi Final 1
India Women vs Thailand Women Thailand Restrict India in 148 runs in Women's Asia Cup T20 Semi Final 1  esakal
क्रीडा

Women's Asia Cup Semi Final 1 : निम्मा संघ गारद करत थायलंडने भारताला 148 धावात रोखले

अनिरुद्ध संकपाळ

India Women vs Thailand Women : महिला आशिया कप टी 20 च्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात प्रथम गोलंदाजी करत थायलंडच्या महिला संघाने भारताला 148 धावात रोखले. भारताने 20 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 148 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शफाली वर्माने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर कर्णधार हरमप्रीत कौरने 30 चेंडूत 36 धावांची खेळी केली. थायलंडकडून सोरनारीन टिपोचने चांगला मारा करत 3 विकेट्स मिळवल्या.

थायलंडने प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केल्यानंतर सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉवर प्लेमध्ये स्मृती मानधना 14 चेंडूत 13 धावा करत बाद झाली. त्यानंतर 10 व्या षटकात 28 चेंडूत 42 धावांची आक्रमक खेळी करणारी शफाली वर्मा देखील बाद झाली. दोन्ही सलामीवीर बाद झाले त्यावेळी भारताच्या 67 धावा झाल्या होत्या.

त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जने 26 चेंडूत 27 धावा करत भारताला शतकी मजल मारून दिली. मात्र भारताला 11 ते 20 षटकात आपली धावगती वाढवता आली नाही. कर्णधार हरनप्रीत कौरने देखील 30 चेंडूत 36 धावा केल्या. हरमन 18 व्या षटकात बाद झाली. त्यानंतर पूजा वस्त्रकारने 13 चेंडूत नाबाद 17 धावा करत भारताला 148 धावांपर्यंत पोहचवले. रिचा घोष 5 चेंडूत 2 तर दिप्ती शर्माने 5 चेंडूत 3 धावा करत निराशा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT