India won historic Gold medal at 45th Chess Olympiad 2024  Sakal
क्रीडा

Chess Olympiad 2024: भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! महिला-पुरुष दोन्ही संघ ठरले 'अव्वल'

India Clinches Maiden Gold Medal at Chess Olympiad 2024: बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले आहे.

सकाळ वृत्तसेवा

बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. भारताच्या पुरुष संघाने ओपन सेक्शनमध्ये पहिल्यांदाच सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

११ व्या आणि अखेरच्या फेरीत भारताच्या स्लोवेनिया विरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदक पक्के केले आहे. याशिवाय महिला संघाने अझरबैझानविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदक निश्चित केले आहे. भारताच्या बुद्धिबळ इतिहासातील हा मोठा क्षण आहे. दोन्ही विभागात सुवर्णपदक पटकावण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली, हे विशेष.

भारतीय संघांच्या या मोठ्या यशाबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. राहुल गांधी, आनंद महिंद्रा यांसारख्या मान्यवरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आगामी काळात डिंग लिरेनविरुद्ध जागतिक अजिंक्यपदाची लढत खेळणार असलेला डी. गुकेश याच्यासह आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरीगेसी, विदित गुजराथी या खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी भारतीय पुरुष संघाच्या घवघवीत यशाची शिल्पकार ठरली.

महाराष्ट्राची दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, आर. वैशाली व हरिका डी. यांनी महिला विभागात ठसा उमटवला. पुरुष विभागात पी. हरिकृष्णा याची व महिला विभागात तानिया सचदेव हिची पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती.

भारतीय पुरुष संघाने सलामीच्या लढतीत मोरोक्को संघावर विजय मिळवल्यानंतर आपली विजयी मालिका आठ सामन्यांपर्यंत नेली. नवव्या सामन्यात त्यांना उझ्बेकिस्तानविरुद्ध २-२ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. त्यानंतर अमेरिका व स्लोवेनिया यांना पराभूत करीत भारताने ६४ घरांच्या पटावर आपणच राजे असल्याचे जगाला दाखवून दिले.

पराभवाविना जेतेपद

भारतीय पुरुष संघाने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये एकाही लढतीत पराभवाचा चेहरा पाहिलेला नाही. अकरापैकी दहा फेऱ्यांमध्ये विजय साकारत पुरुष खेळाडूंनी सुवर्ण भविष्याचे संकेत दिले. फक्त उझ्बेकिस्तानविरुद्धची लढत २-२ अशा बरोबरीत राहिली. स्लोवेनियाविरुद्धच्या अखेरच्या लढतीत डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद व अर्जुन इरीगेसी यांनी विजय साकारले, तर विदित गुजराथी याला ड्रॉवर समाधान मानावे लागले.

महिला विभागातही नऊ विजय

भारतीय महिला खेळाडूंनीही अकरापैकी नऊ सामन्यांमध्ये विजय साकारत आपले वर्चस्व दाखवून दिले. भारतीय महिलांचा पोलंडकडून पराभव झाला. तसेच अमेरिकन संघाविरुद्ध त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले.

अझरबैझानविरुद्धच्या अखेरच्या लढतीत हरिका द्रोणावल्ली, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल यांनी विजय साकारले, तर आर. वैशाली हिला ड्रॉचा सामना करावा लागला.

पुरुषांमधील भारताचे यश

१) मोरोक्कोवर ४-०ने विजय २) आईसलँडवर ४-०ने विजय ३) हंगेरी ब संघावर ३.५-०.५ने विजय ४) सर्बीया संघावर ३.५-०.५ने विजय ५) अझरबैझानवर ३-१ने विजय ६) हंगेरीवर ३-१ने विजय ७) चीनवर २.५-१.५ने विजय ८) इराणवर ३.५-०.५ने विजय ९) उझ्बेकिस्तानविरुद्ध २-२ अशी बरोबरी १०) अमेरिकेवर २.५-१.५ने विजय ११) स्लोवेनियावर ३.५-०.५ने विजय

महिलांमधील भारताचे यश

१) जमैकावर ३.५-०.५ने विजय २) झेक प्रजासत्ताकवर ३.५-०.५ने विजय ३) स्वित्झर्लंडवर ३-१ने विजय ४) फ्रान्सवर ३.५-०.५ने विजय ५) कझाकस्तानवर २.५-१.५ने विजय ६) अर्मेनिया संघावर २.५-१.५ने विजय ७) जॉर्जियावर ३-१ने मात ८) पोलंडकडून २.५-१.५ने हार ९) अमेरिकेविरुद्ध २-२ अशी बरोबरी १०) चीनवर २.५-१.५ने विजय १०) अझरबैझानवर ३.५-०.५ने विजय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT