Aman Saini and Pragati sakal
क्रीडा

Archery Competition : भारतीय तिरंदाज अमन सैनी व प्रगती यांची सुवर्णपदकांवर मोहोर

अमन सैनी व प्रगती या भारताच्या तिरंदाजांनी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये अचूक बाण सोडत सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.

सकाळ वृत्तसेवा

चेंगडू (चीन) - अमन सैनी व प्रगती या भारताच्या तिरंदाजांनी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये अचूक बाण सोडत सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली. भारताचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील हे चौथे सुवर्णपदक ठरले. भारताने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चार सुवर्ण, दोन रौप्य व चार ब्राँझ अशी एकूण दहा पदके पटकावली असून पदकतालिकेत चौथ्या स्थानावर विराजमान आहेत.

अमन व प्रगती या जोडीने कंपाऊंड मिश्र प्रकारात कोरियाच्या सू चाओ-सिऊंगयुन पार्क या जोडीवर १५७-१५६ असा विजय साकारत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. चीन तैपईच्या मिंग चिंग लीन-झेड वेई वू या जोडीने ब्राँझपदक पटकावले.

भारताने तिरंदाजीतील कंपाऊंड प्रकारात आणखी दोन पदके पटकावली. पुरुष व महिला सांघिक गटात ही पदके मिळाली. संगमप्रीत बिस्ला, अमन सैनी व रिषभ यादव या भारताच्या पुरुष तिरंदाजांनी कंपाऊंड सांघिक प्रकारात कोरियाच्या तिरंदाजांना पराभूत करीत ब्राँझपदकाची कमाई केली. भारतीय खेळाडूंनी कोरियाच्या मिनचँग वोन, हॅकजीन सिम व सिऊंगयुन पार्क या तिरंदाजांना २२९-२२५ असे पराभूत केले.

भारताच्या महिला तिरंदाजांनी सुवर्णपदक जिंकण्याची संधी घालवली. कोरियाच्या सोईन सिम, सिऊंगिओन हॅन व सूए चाओ या खेळाडूंनी भारताच्या महिला तिरंदाजांवर २२९-२२४ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. भारताच्या महिला संघात पूर्वशा, प्रगती व अवनीत या खेळाडूंचा समावेश होता.

नेमबाजीत दोन पदके

भारताला तिरंदाजीसह नेमबाजीतही पदकांची कमाई करता आली. भारतीय संघाने नेमबाजीत दोन पदके पटकावली. विजयवीर, उदयवीर सिद्धू व आदर्श सिंग या भारतीय खेळाडूंनी २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्यांनी १७२९ गुणांची कमाई केली. सूर्यप्रताप, सरताज सिंग व ऐश्‍वर्य तोमर यांनी ५० मीटर रायफल सांघिक प्रकारात ब्राँझपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT