Kuhoo Garg  X/BAI_Media
क्रीडा

Kuhoo Garg : भारताच्या नंबर वन बॅडमिंटनपटूची UPSC च्या मैदानातही बाजी, पटकावली 178 वी रँक

UPSC Result: भारताची बॅडमिंटनपटू कुहू गर्गने केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतही मोठे यश मिळवले आहे.

Pranali Kodre

Kuhoo Garg UPSC Result: भारताची बॅडमिंटनपटू कुहू गर्ग हिने फक्त बॅडमिंटन कोर्टमध्येच नाही, तर केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतही (UPSC) बाजी मारली आहे. मंगळवारी युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. परिक्षेत हजारांहून अधिक उमेदवारांना यश मिळाले असून यात कुहू गर्गचाही समावेश आहे.

खेळाबरोबरच आभ्यासही सांभाळत कुहूने युपीएससी परिक्षेत 178 वा रँक मिळवला आहे. तिला तिच्या कारकिर्दीत तिच्या कुटुंबाकडून मोठी मदत झाली आहे. आजतकशी बोलताना कुहूने सांगितले की तिच्या यशाचे श्रेय तिचे वडील माजी आयपीएस अधिकारी अशोक कुमार यांना दिले आहे.

कुहूची आई अलकनंदा प्रोफेसर आहे. तसेच तिने सांगितले की दुखापतीवेळी केलेली मेहनत आणि बॅडमिंटनमुळे तिला शिस्तीचे महत्त्व कळाले. तिने युपीएसी परिक्षेसाठी एका दिवसात 16-16 तास आभ्यासही केला आहे.

तिला युपीएससीच्या मुलाखतीत क्रिकेटमुळे बाकी खेळ मागे पडत आहेत का, असंही विचारलं होतं. त्यावर तिने सांगितलं होतं की क्रिकेट कोणत्याही खेळाला प्रभावित करत नाहीये, उलट क्रिकेट देशात आणखीच प्रगती करत असून बाकी खेळतही प्रगती करू शकतात.

कुहूने डेहराडूनमधील सेंट जोसेफमधून प्राथमिक शिक्षण घेतले आहे. तसेच एसआरसीसी कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

कुहूने असेही सांगितले की तिला तिच्या मित्रांनी आणि तिच्या सोसायटीत राहणाऱ्या ब्युरोक्रेट्सनेही खुप मदत केली.

बॅडमिंटनमध्येही मिळवले मोठे यश

कुहूने तिच्या बॅडमिंटन कारकिर्दीत 56 ऑल इंडिया मेडल्स मिळवले आहेत, तिने 18 आंतरराष्ट्रीय मेडल्सही तिने जिंकले आहेत आहे. तिची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत सर्वोच्च जागतिक क्रमवारी 34 आहे, तर देशात अव्वल क्रमांक ही तिची सर्वोत्त क्रमवारी राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT