Indian boxers to play Asian Champion in Jordan Akola boxing 
क्रीडा

अकोल्याची ‘पलक’ बॉक्सिंगमध्ये चमकली; पोहोचली जॉर्डनमध्ये!

भारतीय बॉक्सर संघाकडून खेळणार एशियन चॅम्पियन स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जॉर्डन (अमन) मध्ये ता. १ मार्च ते १५ मार्च दरम्यान होऊ घातलेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय बॉक्सर संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अकोल्याची ‘ज्युनियर सुवर्ण कन्या’ पकल झामरे भारतीय संघासोबत जॉर्डनमध्ये दाखल झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भारतीय बॉक्सर संघात निवड झालेली पलक आता जॉर्डनमध्ये विदेशी खेळाडूंवर आपल्या ‘पंच’चा दम दाखवणार आहे.

गत वर्षी रायगड येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत, सांगलीत झालेल्या ज्युनियर स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर वर्चस्व स्थापन करणाऱ्या पलकने पुढेही आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत नॅशनल बॉक्सिंग अकॅडमी हरियाणा (रोहतक) येथे भारत खेळ प्राधिकरण व बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने ता. २ ते ६ जानेवारी दरम्यान झालेल्या राष्ट्रीय संघ निवड स्पर्धेत ४० किलो वजन गटात प्रतिस्पर्धी खेळाडूला अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघात ‘पलक’ने आपले स्थान पक्के केले होते.(Indian boxers to play Asian Champion)

आपल्या खेळाची लय कायम राखून एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेतही सुवर्ण पदकावर नाव कोरण्याचा मानस पलकने व्यक्त केला आहे. स्थानिक वसंत देसाई क्रीडांगणाच्या क्रीडा प्रबोधिनीत बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या पलकच्या यशाबद्दल क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, विभागीय क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, विभागीय सचिव विजय शर्मा, महाराष्ट्र बॉक्सिंग सचिव डॉ. राकेश तिवारी व क्रीडा प्रबोधनीच्या वतीने पलकचे अभिनंदन केल्या जात आहे.

एक पदक पक्केच

जॉर्डनमध्ये चालू असलेल्या एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत ४८ किलो वयोगटात पलकने पहिल्या गटात ता. ४ मार्च रोजी होणारा पहिला सामना जिंकल्यास ता. १४ मार्च रोजी अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात पराभव झाला तरी पलकचे कास्य पदक पक्के राहणार आहे.

भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी पलक झामरे या बॉक्सर खेळाडून ज्युनियर एशियन चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकावे अशी, अपेक्ष आहे. नक्कीच पलक सुवर्ण पदक पटकावणार.

-गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी.

सलग दोन स्पर्धेत आपल्या खेळाच्या प्रदर्शनाच्या जोरावर सुवर्ण पदक पटकावणारी पलक झामरे या स्पर्धेतही चांगली कामगिरी करून आणखी सुवर्ण पदकावर नाव कोरून भारतासह अकोल्याचे नाव उज्वल करणार.

- सतीशचंद्र भट, बॉक्सिंग प्रशिक्षक, जिल्हा क्रीडा प्रबोधिनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khelo India Games : जिद्दीच्या जोरावर पालीचा अनुज सरनाईक देशाच्या नकाशावर; नॅशनल बीच गेम्समध्ये महाराष्ट्राला 'सिल्व्हर' मेडल!

Akot BJP AMIM Alliance : "मीडियाने चिंधीचा साप केला"; एमआयएमसोबतच्या युतीवर आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तोडले मौन!

Pune Election Bribery : बाणेर-बालेवाडीत मतदारांना पैशांचे आमिष; पोलिसांनी दोन लाख ६३ हजारांची रोकड केली जप्त!

Latest Marathi News Live Update : अपघात कमी करण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा बसवणार

ODI मध्ये यशस्वी होण्यासाठी, ऋतुराज गायकवाडला भारत सोडण्याचा सल्ला; हा फलंदाज परदेशात असता तर...

SCROLL FOR NEXT