indian cricket team  sakal
क्रीडा

Team India: टीम इंडियात निवड होणं अवघड; BCCIने केली नियमांबाबत मोठी घोषणा

बैठकीनंतर बीसीसीआयने दिले अधिकृत अपडेट

Kiran Mahanavar

BCCI on Team India Selection : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आढावा बैठक रविवार 1 जानेवारी 2023 रोजी मुंबईत झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बीसीसीआयने अधिकृतपणे केवळ दुखापती आणि कामाचा ताण व्यवस्थापनासाठी योजना उघड केल्या आहेत. यापुढे युवा खेळाडूंना टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे. वास्तविक बीसीसीआयच्या या बैठकीत टीम इंडियातील निवडीबाबत माहिती देण्यात आली आहे.

बैठकीनंतर बीसीसीआयने अधिकृत अपडेट दिले आहे. बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी मुंबईत टीम इंडियाची आढावा बैठक बोलावली. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, भारतीय कर्णधार रोहित शर्मा, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि पुरुष निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा उपस्थित होते.

बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, यापुढे युवा खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेसे देशांतर्गत हंगाम खेळावे लागतील. भारतात रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली यांसारख्या मोठ्या देशांतर्गत स्पर्धा आहेत. बीसीसीआयने सांगितले की, उभरत्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये निवडीसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे देशांतर्गत हंगाम खेळावे लागतील. मात्र, शेवटचा खेळाडू खेळण्यासाठी किती सामने आवश्यक असतील हे सांगण्यात आलेले नाही.

भारतीय संघाच्या कामगिरीबाबत आढावा बैठक बरेच दिवस प्रलंबित होती. BCCI ने टी-20 विश्वचषक-2022 नंतर संघाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. एकदिवसीय मालिकेत खालच्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशकडून झालेल्या पराभवाने बीसीसीआयच्या चिंतेत भर टाकली होती. या वर्षी एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे, अशा परिस्थितीत बोर्डाचे लक्ष एकदिवसीय फॉर्मेटवर अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT