Team India
Team India File Photo
क्रीडा

BCCI विराटची मर्जी राखणार; WTC नंतर टीम इंडियाला सुट्टी

सुशांत जाधव

India Tour of England: बायोबबलच्या (Bio-Buble) वातावरणात खेळाडूंना मानसिक थकव्याचा सामना करावा, लागू नये यासाठी भारतीय टीम मॅनेजमेंटने खेळाडूंसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय. न्यूझीलंड विरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर (ICC World Test Championship) टीम इंडियातील खेळाडूंना तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात येणार आहे. विश्रांतीच्या काळात त्यांना बायोबबलमधून बाहेर पडता येईल. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान साउथहम्प्टनच्या मैदानात फायनल सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियातील खेळाडूंना जवळपास 20 दिवस विश्रांती देण्यात येईल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिलीये. (indian-cricket-team-to-get-20-day-break-from-bio-buble-life-after-wtc-final)

14 जुलैला पुन्हा संघातील खेळाडू एकत्र येतील आणि 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यासाठी सज्ज होतील. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी खेळाडूंना ब्रेक दिला जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी संघातील खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका यात सहा आठवड्यांचे अंतर आहे. याकाळात खेळाडूंच्या देखभालीच्या मुद्याकडे कानाडोळा करता येणार नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर खेळाडूंना सुट्टीचा आनंद घेता येईल. सुट्टीच्या काळात त्यांना मित्र-परिवाराला भेटण्याची सुट मिळेल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

2 जूनला भारतीय संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील यावर भाष्य केले होते. दोन सीरिजमध्ये जवळपास 45 दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे आम्हाला मधल्याकाळात ब्रेक मिळू शकेल, असे कोहलीने म्हटले होते. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहलीच्या मतशी सहमत असल्याचे म्हटले होते.

मग बायोबबलचं काय?

सध्याच्या घडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या देशात वेगवेगळे निर्बंध आहेत. इंग्लंडमध्ये जी क्रिकेट स्पर्धा सुरु आहे त्यासाठी विशेष नियमावलीचे पालन करावे लागत आहे. कोरोना चाचणी त्यानंतर क्वारंटाईनचा कालावधी आणि मग सरावाला परवानगी अशा प्रक्रियातून खेळाडूला जावे लागते. त्यामुळे जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर खेळाडूंना बाहेर फिरण्याची परवानगी मिळाली तर त्यांना इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी पुन्हा एकदा या सर्व प्रक्रियेतून जावे लागू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT