Indian Cricket Team Unhappy with After-practice Food in Sydney sakal
क्रीडा

T20 World Cup : टीम इंडिया उपाशी! ऑस्ट्रेलियन जेवणावर टाकला बहिष्कार, वाचा कारण

टीम इंडियाला सिडनीत मिळाले नाही जेवण? प्रकरण आयसीसीपर्यंत पोहोचले

Kiran Mahanavar

Team India T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडिया आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सिडनीला पोहोचली आहे. भारतीय खेळाडूंनी मंगळवारी दुपारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सराव केला. सराव सत्रानंतर जेवण करताणा त्यांना जेवण खूप थंड आणि कमी दिले, त्यामुळे टीम इंडियाने दुपारच्या जेवणावर बहिष्कार टाकला. खेळाडूंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाची आयसीसीकडे तक्रार करण्यात आली आहे.

सिडनीमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणावर भारतीय खेळाडू नाराज का होते. कारण त्यांना दिलेले जेवण थंड होते. आता थंड जेवण कोणाला आवडेल? त्यामुळे भारतीय खेळाडूंनी फक्त फळे खाणे योग्य मानले. सराव सत्रानंतर खेळाडू मैदानात जेवण करतात आणि नंतर टीम बसने हॉटेलमध्ये जातात. पण, तीच गोष्ट सिडनीत दिसली नाही. त्यानंतर संघाच्या सर्व खेळाडूंनी सरावानंतर हॉटेलमध्ये जाऊन पुन्हा जेवण केल्याचे वृत्त आहे. जेवणाशिवाय टीम इंडियाच्या सराव स्थळाबद्दलही नाराजी व्यक्त केल्याची बातमी आली आहे.

सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) गुरुवारी 27 ऑक्टोबर रोजी दुहेरी सामने आयोजन केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा दिवसा बांगलादेशशी सामना होईल, त्यानंतर संध्याकाळी भारताचा नेदरलँडशी सामना होणार आहे. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स बुधवारी एससीजीमध्ये सराव सत्र आयोजित करतील.

2021 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने ऑलिम्पिक पार्कमध्ये मुक्काम करताना ब्लॅकटाउनमध्ये तळ ठोकला होता. मात्र संघाला सामन्याच्या पूर्वसंध्येला एवढे लांबचे अंतर कापायचे नव्हते. आयसीसीने सर्व सहभागी संघांचे वेळापत्रक आधीच तयार केले होते. तथापि, ते त्या वेळापत्रकात टिकून राहायचे की नाही हे संघांवर अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

Latest Marathi News Live Update : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

SCROLL FOR NEXT