Lata Mangeshkar 
क्रीडा

क्रिकेटप्रेमी लतादीदींनी शतकवीर खेळाडूसाठी केला होता गाजराचा हलवा

सकाळ डिजिटल टीम

१९७९ मध्ये पाकिस्तानला भारताने पराभूत केलं होतं. त्यानंतर ताज हॉटेलमध्ये लता मंगेशकर यांनी संघाची भेट घेतली होती.

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengasarkar) यांनीही लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणी ताज्या केल्या. आपल्या गायनाने रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांना गाण्याशिवाय क्रिकेटचीसुद्धा खूप आवड होती. भारताच्या वर्ल्ड कप क्रिकेट संघातील खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी त्यांच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

लता मंगेशकर यांचे क्रिकेटवर खूप प्रेम होते. अनेक कसोटी सामन्यांना त्या उपस्थित असायच्या. लंडनला लॉर्डसच्या समोरच त्यांचं घर होतं. क्रिकेटची त्यांना आवड होती. लंडनला सामने असायचे तेव्हा त्या खेळाडुंना घरी बोलवायच्या. मी शतक मारलं होतं तेव्हा त्यांनी गाजर हलवा केला होता. झणझणीत मटण केलं होतं. राजसिंग हे मॅनेजर सोबत होते. त्यांच्यासोबत क्रिकेटवर गप्पा मारायला आवडायचं अशा आठवणी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी सांगितल्या.

लता मंगेशकर यांनी भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्या संघातील खेळाडूंसाठी एक प्रोग्रॅम दिल्लीत केला होता. या कार्यक्रमातून मिळालेले पैसे त्यांनी खेळाडूंना बक्षीस म्हणून दिले होते. याचीही आठवण दिलीप वेंगसरकर यांनी सांगितली. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला २५ हजार रुपये दिले होते. दिल्लीत प्रोग्रॅम केला होता. त्यानंतर खेळाडूंना प्रत्येकी १ लाख रुपये मिळाले होते.

पहिल्यापासूनच क्रिकेटवर प्रेम असणाऱ्या लता मंगेशकर यांनी अनेकदा क्रिकेटपटूंची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले होते. वेंगसकर यांनी सांगितलं की, १९७९ मध्ये पाकिस्तानला भारताने पराभूत केलं होतं. त्यानंतर ताज हॉटेलमध्ये लता मंगेशकर यांनी संघाची भेट घेतली होती. तेव्हा त्यांच्यासोबत आशा भोसलेसुद्धा भेटायला आल्या होत्या. त्यांनी सर्वांना बक्षीस दिले आणि कौतुकही केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT