Mohammed Shami esakal
क्रीडा

Mohammed Shami च्या जीवनात नव्या पार्टनरची एन्ट्री

धनश्री ओतारी

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यंदाचे आयपीएल मैदान चांगलेच गाजवले आहे. गुजरात टायटन्सच्या विजयात मोहम्मद शमीचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या या खेळासह क्रिकेट जगतात खासगी आयुष्यामुळं चर्चेत राहणाऱ्या या शमीच्या जीवनात नव्या पार्टनरची एन्ट्री झाली आहे. त्याचा फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या सिरीजमधून शमीला ब्रेक दिला आहे. सध्या मोहम्मद शामी सुट्टी एन्जॉय करतोय. दरम्यान, नुकतचं त्याने एक बाईक खरेदी केली आहे. त्यान ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आहे.

मोहम्मद शामीने Royal Enfield बाइक खरेदी केलीये. या गाडीची किंमत तीन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मोहम्मद शमीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बाईकसोबत फोटो पोस्ट केला आहे. cruising partner अशी कॅप्शन शमीने दिली आहे.

मोहम्मद शामीने रॉयल एनफील्डची कॉन्टिनेंटल जीटी 650 बाइक खरेदी केलीये. मिळालेल्या माहितीनुसार, या बाइकची किंमत (एक्स शो रूम) तीन लाख चार हजार रुपये इतकी आहे. मोहम्मद शमीच्या Royal Enfield Continental GT 650 बाइकमध्ये एकापेक्षा एक उत्तम फिचर्स आहेत. या गाडीचं इंजिन 650 सीसी आहे. त्यासोबतच 6 स्पीडचं मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. फ्यूल टँकची लीमिट 12.5 लीटर इतकी आहे. बाईकचं मायलेज प्रति लीटर सरासरी 25 किलोमीटर इतकं आहे.

मोहम्मद शमीने क्रोम-फिनिश ऑप्शन विकत घेतला आहे. याशिवाय, Continental GT 650 ब्रिटिश रेसिंग ग्रीन, DUX Deluxe आणि Ventura Storm आणि Rocker Red सारख्या इतर रंगांच्या पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT